वारंगाफाटा दुकान चोरी

वारंगाफाटा येथे एकाच दिवशी दोन दुकाने फोडून १ लाख ४४ हजार मुद्देमाल लंपास 

Warangafata shop theft: कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथे एकाच रात्री चोरट्यांनी दोन दुकाने फोडून १ लाख ४४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला याबाबत ३० सप्टेंबर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

वारंगाफाटा येथे एकाच दिवशी दोन दुकाने फोडून १ लाख ४४ हजार मुद्देमाल लंपास 

Warangafata shop theft

दोन दिवसांनी गुन्हा दाखल 

आखाडा बाळापूर (Warangafata shop theft) : कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथे एकाच रात्री चोरट्यांनी दोन दुकाने फोडून १ लाख ४४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला याबाबत ३० सप्टेंबर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

वारंगाफाटा येथे मुख्य रस्त्यावर असलेल्या कॉम्प्लेक्स मधील प्रमोद सोनबाराव पतंगे रा.कुर्तडी यांचे भास्कर कृषी हार्डवेअर दुकान व बाजुच्या दुकान ही दोन दुकाने चोरट्यांनी फोडून सबमर्सिबेल केबल ४ एम एम एम. चा २५० मिटर व २.५ एम एम चा ३००मीटर  कीमत ७२ हजार रुपये व रासायनिक खते सहा बॅगा ३० हजार४०० हजार रुपये,व नगदी ४२ हजार १०० रूपये असा १लाख ४४ हजार ५०० रुपये मुद्देमाल चोरट्यांनी २७ सप्टेंबर रात्री आठ ते २८ सप्टेंबर सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान चोरी गेला. याबाबत ३० सप्टेंबर रात्री आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत भिंगारे हे करत आहेत.

टैग्स: Warangafata shop theft