सोने दागिने चोरी

परभणीतील सेलुत महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावले...

Gold Jewelry Theft : परभणीतील सेलू शहरात १६ मे सायंकाळी महिलेच्या गळ्यातील दुधू सोन्याचे गंठण (₹2 लाख) चोरी करण्यात आले. दोन अनोळखी चोरांनी गृहपयोगी

परभणीतील सेलुत महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावले...

Gold Jewelry Theft

 

दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल दिड लाखाचा मुद्देमाल लंपास

परभणी (Gold Jewelry Theft) : सेलू येथील गृहपयोगी साहित्य खरेदीसाठी स्कुटीवरुन जात असताना मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी महिलेच्या गळ्यातील दिड लाख रुपये किंमतीचे गंठण हिसकाविले. ही घटना १६ मे रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास सेलू शहरात घडली. सदर प्रकरणी १७ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्नेहल भरदम यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी व साक्षीदार हे त्यांच्या स्कुटीवर बसून गृहपयोगी साहित्य खरेदीसाठी सेलूमधील एका सुपरशॉपीकडे जात होते. यावेळी त्यांच्या मागून दुचाकीवर दोनजण आले. त्या व्यक्तींनी महिलेच्या गळ्यातील दिड तोडे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकाविले. त्यानंतर (Gold Jewelry Theft)  संबंधित दुचाकीवर भरधाव वेगात पळून गेले. या प्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींवर सेलू पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोउपनि. पवार करत आहेत.