सेलू बसस्थानक घटना

बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातून मंगळसुत्र लंपास

Selu Bus Stand Crime: बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र लंपास करण्यात आली. ही घटना बुधवार १० जून रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास सेलू बसस्थानकात घडली.

बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातून मंगळसुत्र लंपास

Selu Bus Stand Crime

सेलू बसस्थानकातील घटना; गर्दीचा फायदा घेत चोरी

सेलू (Selu Bus Stand Crime) : बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र लंपास करण्यात आली. ही घटना बुधवार १० जून रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास सेलू बसस्थानकात घडली. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने दागिन्यावर डल्ला मारला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक येथे कामाला असलेले दाम्पत्य मुलीकडे पाथरीला जाण्यासाठी बस पकडण्यासाठी सेलू बसस्थानकावर आले होते. पाथरी आगाराची सेलू - पाथरी एम.एच. २०. ८७९२ या बसमध्ये चढत असताना कमल पंडितराव डंबाळे वय ७० वर्ष, रा. धनेगाव या महिलेच्या गळ्यातील तीन ग्राम सोन्याचे मंगळसुत्र चोरट्याने लंपास केले. घटनेची माहिती डायल ११२ वर पोलिसांना देण्यात आली. तक्रार देण्यााठी दाम्पत्याला पोलीस स्थानकात नेण्यात आले. दरम्यान मागील अनेक दिवसांपासून बसस्थानक परिसरात चोर्‍या तसेच महिला व मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

पोलीस चौकी नावालाच 
बसस्थानकामध्ये मोठ्या थाटात पोलीस चौकीचे उद्घाटन करुन चौकी सुरू करण्यात आली होती. या चौकीत पोलीस कर्मचार्‍याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. बसस्थानक परिसरात चोरी बरोबरच महिला, मुलींच्या छेडछाडीचे प्रकार घडत आहेत. याकडे लक्ष देवून आवश्यक उपाय योजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

टैग्स: Selu Bus Stand Crime