सावरगाव अत्याचार प्रकरण

अल्पवयीन मुलीवर अत्याचार: आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची शिवसेनेची जोरदार मागणी

Sawargaon Minor Girl Abuse: महाराष्ट्रातील सावरगावमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर शिवसेनेने आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार: आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची शिवसेनेची जोरदार मागणी

Sawargaon Minor Girl Abuse

पातूर (Sawargaon Minor Girl Abuse) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यांनी कुटुंबीयांना धीर देत शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला. तसेच पीडित कुटुंबाला शिवसेना पक्षाच्या वतीने एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले. या प्रकरणाचा जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीस लवकरात लवकर कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

सावरगाव (Sawargaon Minor Girl Abuse) येथे 10 वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेतील नराधम आरोपीस कठोरात कठोर अशी फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी तीव्र मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. 

या (Sawargaon Minor Girl Abuse) घटनेनंतर सावरगावसह परिसरातील शिवसैनिकांनी तीव्र भावना व्यक्त करत दोषींना कोणतीही दया न दाखवता जलदगती न्यायालयामार्फत कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिवसेना अकोला जिल्हा संपर्क प्रमुख राजन साळवी साहेब यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पीडित कुटुंबाच्या पाठी शिवसेना भक्कम पणे उभी राहील. आरोपीस फाशीची शिक्षा मिळावी म्हणून प्रयत्न करणार आहे.

“आज एका निष्पाप मुलीवर अत्याचार झाला आहे, उद्या अशी घटना दुसऱ्या कोणाच्या घरात घडू नये यासाठी समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे,” अशी भावना शिवसेना जिल्हाध्यक्ष नारायण गव्हाणकर साहेब यांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण शिवसेना एक परिवार म्हणून या कुटुंबाच्या पाठीमागे उभा आहे. असा शब्द शिवसेना अकोला जिल्हा प्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनीही दिला आहे.

संपूर्ण जिल्हाभरातून या (Sawargaon Minor Girl Abuse) घटनेचा निषेध होत असून पीडित मुलीला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशीच अपेक्षा शिवसैनिक व्यक्त करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या वतीने 11000 रु आर्थिक मदत पीडित कुटुंबाला देण्यात आली. मा.आमदार शिवसेना जिल्हा प्रमुख नारायणरावजी गव्हाणकर, जिल्हाप्रमुख पांडे गुरुजी,महिला जिल्हाप्रमुख उषाताई विर्क, मा. जिप.सदस्य बाळासाहेब तायडे, डॉ अशोक ओळंबे,शिवसेना जिल्हा समन्वयक प्रणव तायडे पाटील,तालुका प्रमुख बाळू बगाडे, निलेश तोताराम कापकर, पातूर उप तालुका प्रमुख सागर रामेश्वर लाड, सावरगाव पंचायत समिती प्रमुख, प्रमोद चोंढकर  सावरगाव पंचायत समिती उपप्रमुख  शंकर जाधव सावरगाव शाखा अध्यक्ष  राधेश्याम राठी, सावरगाव सरपंच  अजय राठी, जानू जाधव सागर बिल्लेवार महिला तालुका संगीता इंगळे,शिवसेना उपतालुका प्रमुख कैलास कचाले, मा.सरपंच देवराव हातोले,तालुका संघटक प्रल्हाद मदने, मळसुर सर्कल प्रमुख संपत राठोड , मळसुर शाखा प्रमुख बाळू पांडे,योगेश ताले, सूरज ताले,सुभाष पाटील,रमेश ताले इत्यादी.

संबंधित सामग्री

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

मराठवाडा पदवीधर मतदार यादीत ‘उद्धव मस्के’ऐवजी उद्धव ठाकरे यांचे नाव आल्याचा दावा. दिलीप घुगे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली.

Oct 05, 2026
शेतकरी आत्महत्यांवर 'नगदी अनुदान' हाच प्रभावी मार्ग

शेतकरी आत्महत्यांवर 'नगदी अनुदान' हाच प्रभावी मार्ग

Shiv Sena Farmers' Conference: शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारखी गंभीर समस्या थांबवण्यासाठी व्यावहारिक मार्ग असल्याचे प्रतिपादन शिवसेना (शिंदे गट) नेते तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026