रोहना मार्ग अपघात

रोहना मार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Rohna Road Accident: रोहना मार्गावर झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला तर दोन तरुण गंभीर जखमी झाले. अपघात रविवारी रात्री घडला आणि त्यात चौघांची दुचाकी समोरासमोर धडकली.

रोहना मार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Rohna Road Accident

खापरखेडा (Rohna Road Accident) : खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील रोहना मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि. 19) रात्री सुमारे 10 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी मर्ग कलम 194 बीएनएस अंतर्गत नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरगम सुनील साखरे (वय 25, रा. रोहना) हा आपल्या मित्र शुभम कुंभरेसोबत दुचाकीने खापरखेडाहून रोहना येथे जात होता. गावात गुणशील पाटील यांच्या हळदीच्या कार्यक्रमाला ते जाणार होते.

दरम्यान, प्रफुल उर्फ छोटू कुंभरे (वय 18, रा. वलनी खदान) हा आपल्या मित्र रितिकसोबत दुसऱ्या दुचाकीवरून वलनीकडे निघाला होता. दोघेही एकाच कार्यक्रमातून परतत होते. रोहना गावाबाहेरील महावितरण उपकेंद्राजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. (Rohna Road Accident) अपघाताच्या वेळी रस्त्यावर काही महिला व त्यांच्यासोबत एक सात वर्षांची मुलगी चालत होती. त्या मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात प्रफुलने दुचाकी बाजूला घेतली, तर समोरून येणाऱ्या सरगमनेही वाहन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी दोन्ही दुचाकींची भीषण धडक झाली.

या (Rohna Road Accident) धडकेत चौघेही वाहनावरून दूर फेकले गेले. त्यात सरगम व प्रफुल यांना जबर दुखापत झाली. सरगमचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला, तर प्रफुलला नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आले. अपघातात रितिक व शुभम हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास प्रतिभा डाखोळे करीत आहेत.

संबंधित सामग्री

पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; ४ तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; ४ तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Aug 11, 2026
खापरखेडा वीज प्रकल्पात करंट लागून कामगाराचा मृत्यू 

खापरखेडा वीज प्रकल्पात करंट लागून कामगाराचा मृत्यू 

खापरखेडा येथील 210 मेगावॅट वीज प्रकल्पात मंगळवारी सकाळी झालेल्या दुर्घटनेत करंट लागून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Apr 21, 2026