परभणी मृतदेह

परभणीतील बनवस शिवारात अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला अपघात की घातपात?  

Parbhani dead body: पालम तालुक्यातील बनवस शिवारात एका 32 वर्षीय अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला. घटनास्थळी मोटारसायकल आणि मोबाईल फोन सापडले. पोलीस तपास सुरू आहे.

परभणीतील बनवस शिवारात अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला अपघात की घातपात?  

Parbhani dead body

पालम पोलिसांसमोर आव्हान

परभणी (Parbhani dead body) : पालम तालुक्यातील मौजे बनवस ते माळेगाव रस्त्यावर खडी मशीनजवळील वळणावर एका  सुमारे ३२ वर्षीय अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित तरुण मोटारसायकलसह खड्ड्यात पडलेल्या अवस्थेत मृत आढळून आला.गावातील काही मुले व्यायामासाठी गेले असता त्यांना रस्त्याच्या कडेला खड्ड्यात एक व्यक्ती पडलेली दिसली. जवळ जाऊन पाहणी केली असता तो मृत अवस्थेत असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने गावचे पोलीस पाटील भाऊसाहेब मोहनराव कदम यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. पोलीस पाटील कदम यांनी त्वरित पालम पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच पोनि. एस. के. खटाने यांनी बिट जमादार गणेश खोमणे, सुदाम धुळगंडे आणि पी.आर. सपकाळ यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटना स्थळाची पाहणी करून पंचनामा केला. पाहणीत दुचाकीचे विशेष असे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले नाही. (Parbhani dead body) घटनास्थळी रक्तस्राव झाल्याचेही आढळले नाही. मृताजवळ एक मोबाईल फोन सापडला, मात्र त्यामध्ये सिमकार्ड नसल्याचे पोलिसांनी सांगितले. ओळख पटवण्यासारखा अन्य कोणताही पुरावा घटनास्थळी मिळून आलेला नाही.

या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर प्रथमदर्शनी हा( Parbhani dead body) अपघात असल्याचा अंदाज व्यक्त होत असला तरी घातपाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे हा मृत्यू नेमका अपघाती आहे की घातपात, याचा तपास लावणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. दरम्यान, पालम पोलीस करत असून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

Mini Truck-Motorcycle Accident: शहरातून जाणाऱ्या हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर ग्रीनपार्कजवळ सोमवारी (दि. ५) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मिनीडोर आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.

Oct 05, 2026
माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

Livestock Electric Accidental Death: महावितरणच्या विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र किंवा अन्य विद्युत उपकरणांमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026