परभणी गहू काळा बाजार

परभणीत काळ्या बाजारात जाणारा राशनचा 300 क्विंटल गहू जप्त

Parbhani Wheat Black Market: परभणीतील गंगाखेडमध्ये पोलिसांनी राशनच्या ३०० क्विंटल गहूच्या ट्रकवर कारवाई केली. मुद्देमालासह चालक याव्यतिरिक्त खाजगी वाहन ताब्यात घेतले.

परभणीत काळ्या बाजारात जाणारा राशनचा 300 क्विंटल गहू जप्त

Parbhani Wheat Black Market

 

स्थागुशा पथकाची कारवाई; २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

परभणी (Parbhani Wheat Black Market) : गंगाखेड येथे चढ्या दराने काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा राशनचा अंदाजे ३०० क्विंटल गहू पकडत स्थागुशाखेच्या पथकाने मंगळवार ३० जून रोजी पहाटे गंगाखेड पोलीस ठाण्यात जमा केला आहे. स्थागुशा पथकाच्या या कारवाईमुळे राशनच्या धान्याचा काळा बाजार करणाऱ्या धान्य माफियामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशान्वये व स्थगुशाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाय यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार २९ जून रोजी रात्री उशिराने स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि गणेश सवंडकर, पोह लक्ष्मण कांगणे, पोह नेताजी गित्ते,  पोह अनिल राठोड आदींचे पथक गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहरात गस्तीवर असतांना गंगाखेड येथून पालमकडे जाणाऱ्या एमएच २६ एई ४३४५ क्रमांकाच्या (Parbhani Wheat Black Market) एका ट्रकमध्ये काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री करण्याकरिता राशनचा गहू जात असल्याची खात्रीशीर व गोपनीय माहिती मिळाल्याने स्थागुशाच्या पथकाने खाजगी वाहनाने ट्रॅकचा पाठलाग केला.

 आर के मंगल कार्यालयाजवळ कॅनलच्या समोर  सार्वजनिक रोडवर ट्रक थांबवून चालकाला ताब्यात घेतं वाहनाची पाहणी करत अंदाजे २० लाख रुपये किंमतीचा ट्रक व त्यामध्ये अंदाजे ६ लाख रुपये किंमतीचा ६०० कट्टे गहू प्रत्येकी वजन अंदाजे ५० किलो प्रमाणे ३०० क्विंटल गहू असा एकूण अंदाजे २६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन ट्रक चालक शेख अजीम शेख अजीज वय ४० वर्ष रा. देगलूर नाका नांदेड याच्याकडे सदर गहू बाबत कोणताही वाहतूक व (Parbhani Wheat Black Market) विक्रीचा परवाना आढळून आला नसल्याने मंगळवार ३० जून रोजीच्या पहाटे पुढील कारवाई करिता ताब्यात घेतलेला ट्रक व चालक मुद्देमालासह गंगाखेड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. या कारवाईने स्वस्त धान्य दुकानातील गहू, तांदूळ याचा काळा बाजार करणाऱ्या धान्य माफियामध्ये मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.

संबंधित सामग्री

परभणीत गुंजच्या गोदापात्रात अवैध वाळू उपसा करणारे ७ ट्रॅक्टर जप्त...?

परभणीत गुंजच्या गोदापात्रात अवैध वाळू उपसा करणारे ७ ट्रॅक्टर जप्त...?

Parbhani Illegal sand mining: परभणीत गुंज शिवाराच्या पांढरपानी नद्यापात्रात अवैध वाळू उत्खनन करत असलेल्या सात ट्रॅक्टरांच्या मालकीवर ६० लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Aug 21, 2026
परभणीत नशेसाठी वापरण्यात येणारा सिरपचा साठा जप्त...!

परभणीत नशेसाठी वापरण्यात येणारा सिरपचा साठा जप्त...!

Parbhani syrup stock seized: परभणीतच्या खंडोबा बाजारात रात्रगत पोलिस पथकाने अवैध नशेसाठीच्या वाहतूकाची माहिती मिळवून २ लाख ३० हजार रु.चा साठा जप्त केला.

Jul 02, 2026