परभणी मुली बेपत्ता प्रकरण

परभणीत चुडावा परिसरातील १४ वर्षीय बेपत्ता मुलीचा आठ दिवसानंतरही शोध लागेना; कुटुंबीयांचा संताप 

Parbhani Girl Missing case: १४ वर्षे अल्पवयीन मुलगी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची गंभीर घटना, नातेवाईकातील एका युवकाने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप

परभणीत चुडावा परिसरातील १४ वर्षीय बेपत्ता मुलीचा आठ दिवसानंतरही शोध लागेना; कुटुंबीयांचा संताप 

Parbhani Girl Missing case

 

पोलीस अधीक्षकांकडे धाव घेण्याचा इशारा

पूर्णा (Parbhani Girl Missing case) : तालुक्यातील चुडावा परिसरातील नवीन वसाहतीत राहणारी १४ वर्षे ४ महिन्यांची अल्पवयीन मुलगी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. नातेवाईकातील एका युवकाने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, चुडावा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल होऊनही तब्बल आठ दिवस उलटले तरी मुलीचा शोध लागलेला नसल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

फिर्यादीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी २६ जून रोजी सायंकाळी घरातून बेपत्ता झाली. (Parbhani Girl Missing case) कुटुंबीयांनी नातेवाईकांसह परिसरात सर्वत्र शोधाशोध केली, मात्र तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान, मुलगी संशयित युवकासोबत मोटारसायकलवर जाताना काही नागरिकांनी पाहिल्याची माहिती समोर आली. त्यानंतर संबंधित युवकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून चुडावा पोलिसांनी संबंधित युवकाविरुद्ध अपहरणासह लागू असलेल्या कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

मात्र, (Parbhani Girl Missing case) गुन्हा दाखल होऊन आठ दिवस उलटूनही मुलीचा शोध लागलेला नसल्याने मुलीचे आई-वडील प्रचंड मानसिक तणावाखाली असून, न्याय मिळावा आणि तपासाला गती द्यावी, यासाठी ते लवकरच पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, मागील दहा दिवसांत परिसरात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा गंभीर प्रकरणांत पोलिसांनी तातडीने कारवाई करून मुलींचा सुरक्षित शोध लावणे अपेक्षित असताना तपासातील संथगतीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मुलगी सुरक्षित परत कधी येणार?
आठ दिवसांपासून मुलीचा कोणताही ठावठिकाणा नाही. कुटुंबीयांचे अश्रू, वाढती चिंता आणि पोलिसांच्या संथ तपासामुळे  कुटुंबीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, या प्रकरणात तातडीने विशेष पथक नेमून मुलीचा शोध लावण्याची मागणी जोर धरत आहे.

संबंधित सामग्री

प्रेमानंद महाराजांचे आश्रम पुन्हा चर्चेत; मुलगा आणि महिला बेपत्ता...?

प्रेमानंद महाराजांचे आश्रम पुन्हा चर्चेत; मुलगा आणि महिला बेपत्ता...?

Premanand Maharaj Ashram: प्रेमानंद महाराजांच्या राधा केलि कुंज आश्रमाशी संबंधित काही घटनांमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आश्रमात आलेला 17 वर्षीय अनुज चौधरी हा मुलगा बेपत्ता झाल्याचा दावा

Oct 04, 2026
शाळेत गेलेली १४ वर्षीय मुलगी बेपत्ता; पातूर पोलिसांत गुन्हा दाखल

शाळेत गेलेली १४ वर्षीय मुलगी बेपत्ता; पातूर पोलिसांत गुन्हा दाखल

Patur Girl Missing Case: पातूर शहरातील १४ वर्षीय मुलगीचा शाळेत गेल्यानंतर घरी परत न आल्याने कुटुंब हवामानात ताणलेला आहे. घरापासून त्या शोधण्यासाठी नागरिकांनी सहाय्य केले असावे.

Jul 22, 2026