परभणी युवक मृत्यू

परभणीत कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी

Parbhani youth Death: मानवत तालुक्यातील केकरजवळा येथे सोमवार रात्री कंटेनर चालकाने भरधाव वेगात धडके दिली. यामुळे २० वर्षाचा तरूण मृत झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.

परभणीत कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी

Parbhani youth Death

मानवत तालुक्यातील केकरजवळा येथील घटना वाहनचालकावर गुन्हा

परभणी (Parbhani youth Death) : मानवत  तालुक्यात भरधाव वेगातील कंटेनर चालकाने दिलेल्या धडकेत २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवार ८ जून रोजी रात्री ८.३० च्या सुमारास पाथरी - पोखर्णी रोडवरील केकर जवळा शिवारात घडली. सदर प्रकरणी (Parbhani youth Death) कंटेनर चालकावर मानवत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद खयूम यांनी फिर्याद दिली आहे. सय्यद महेर सय्यद महेबुब वय -२० वर्ष असे मयत तरूणाचे नाव आहे. सय्यद महेर हा तरूण केकरजवळा शिवारात शौचास गेला.

यावेळी भरधाव वेगातील डी.डी.०१ पी ९६०६ या क्रमांकाच्या कंटेनर चालकाने सय्यद महेर, शेख मेहबुब या दोघांना जोराची धडक दिली. जखमींना उपचारासाठी पाथरी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी प्रथमोपचार करून परभणी येथील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. (Parbhani youth Death) अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाला. त्याला अपघात स्थळावरून दोन किमी अंतरावर पकडण्यात आले. उपचारादरम्यान रात्री ११.३० च्या सुमारास सय्यद महेर याचा मृत्यू झाला. युवकाच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कंटेनर चालक प्रकाश गणपत राठोड याच्यावर मानवत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026