परभणी चोरी प्रकरण

परभणीत स्कुटीच्या डिक्कीतून १ लाख ४० हजार लंपास...!

Parbhani theft case: परभणीतील एका स्कुटीच्या डिक्कीतून १ लाख ४० हजार रुपयांची रोकड चोरी झाली. फिर्यादी आणि त्यांचा मित्र रोकड काढत असताना चोरी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या अनोळख्या व्यक्ती

परभणीत स्कुटीच्या डिक्कीतून १ लाख ४० हजार लंपास...!

Parbhani theft case

 

परभणीतील जुना मोंढा भागातील घटना दोन अनोळखींवर गुन्हा दाखल

परभणी (Parbhani theft case) : स्कुटीच्या डिक्कीतून १ लाख ४० हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आल्याची घटना परभणी शहरातील जुना मोंढा भागात घडली. या प्रकरणी दोन अनोळखींवर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमीर खान यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी व त्यांचा मित्र वसमत रोडवरील एका बँकेत आले होते. या ठिकाणाहून त्यांनी धनादेशाद्वारे १ लाख ५० हजाराची रोकड काढली.

ही (Parbhani theft case) रोकड स्कुटीच्या डिक्कीमध्ये ठेवली. त्यानंतर संबंधित जुना मोंढा भागातील एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी थांबले. चहा पिऊन झाल्यानंतर स्कुटी घेऊन अशोक नगर येथे पोहोचले. या ठिकाणी स्कुटीची डिक्की उघडली असता त्यांना डिक्कीमध्ये १ लाख ५० हजार रुपयांपैकी केवळ दहा हजार रुपये दिसले. उर्वरित १ लाख ४० हजाराची रोकड चोरीला गेल्याचे समजले. त्यानंतर फिर्यादी व त्यांचा मित्र पुन्हा जुना मोंढा भागात आले.

या ठिकाणी त्यांनी एका मोबाईल दुकानामधील सीसीटिव्ही कॅमेरा पाहिला असता एक अनोळखी इसम स्कुटीच्या डिक्कीतून रक्कम चोरी करत असताना दिसून आला. सदर व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीसोबत दुचाकीवर बसून निघून गेला. या प्रकरणी दोन अनोळखींवर ३१ मे रोजी नानलपेठ पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

परभणीत महिलेच्या गळ्यातील पाच ग्रॅमचे मंगळसूत्र लंपास

परभणीत महिलेच्या गळ्यातील पाच ग्रॅमचे मंगळसूत्र लंपास

Jintur Bus Stand Crime: जिंतूर  येथील बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील सुमारे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याच्या मण्यांचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली..

Jul 29, 2026
परभणीत चोरीच्या घटना वाढल्या; संशयीतांची धरपकड

परभणीत चोरीच्या घटना वाढल्या; संशयीतांची धरपकड

Parbhani Theft Crime: परभणीतील शेतकरी समुदायावर चोरांचे धोका वाढला आहे. पोलिसांनी संशयीतांना ताब्यात घेऊन पकडून गुन्हा दाखल करण्यात आले.

Jul 14, 2026
परभणीत शाखा अधिकार्‍याने केला दहा लाखाचा अपहार...?

परभणीत शाखा अधिकार्‍याने केला दहा लाखाचा अपहार...?

Parbhani Branch Officer: अ‍ॅडव्होकेटे मल्टीस्टेट पर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शाखा परभणी मध्ये आर्थिक अनियमिततेचा प्रकार पुढे आला आहे. शाखा अधिकारी याने सोसायटीची रक्कम बँकेतील सोसायटी

Jul 03, 2026