चिखली कुख्यात गुंड ईश्वर धनवटे

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

Chikhli gangster Ishwar Dhanwate: शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चिखली पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध धडक कारवाई सुरू ठेवली आहे. अंतर्गत विविध गंभीर गुन्ह्या

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

Chikhli gangster Ishwar Dhanwate

 

चिखली पोलिसांची मोठी कारवाई; एमपीडीएअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

चिखली (Chikhli gangster Ishwar Dhanwate) : शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चिखली पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध धडक कारवाई सुरू ठेवली आहे. याच अंतर्गत विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या कुख्यात गुंड ईश्वर प्रकाश धनवटे याच्याविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषध द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्याविरुद्ध प्रतिबंधक कायदा (MPDA Act 1981) अन्वये कारवाई करण्यात आली असून, त्याला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

ईश्वर धनवटे (Chikhli gangster Ishwar Dhanwate) याच्याविरुद्ध यापूर्वी मारामारी, चोरी, जबरी चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीररीत्या बंदूक बाळगणे यांसह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तसेच त्याच्या कृत्यांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिखली पोलीसांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला.

सदर प्रस्ताव जिल्हा दंडाधिकारी, बुलढाणा यांच्याकडे सादर करण्यात आला होता. प्रस्तावाची सक्षम प्राधिकाऱ्यांकडून पडताळणी झाल्यानंतर जिल्हा दंडाधिकारी, बुलढाणा यांनी प्रस्तावास मंजुरी देत ईश्वर प्रकाश धनवटे यास एक वर्षाच्या कालावधीसाठी कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आदेशाची अंमलबजावणी बुलढाणा जिल्हा कारागृह येथे करण्यात आली आहे.

ही (Chikhli gangster Ishwar Dhanwate) कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात PSI शरद भागवतकर, पोलीस अंमलदार विजय किटे, अमोल गवई, अजय इटावा, प्रशांत धंदर, राहुल पायघन, निलेश सावळे, ज्ञानेश्वर शिंदे, ललिता खरात व रुपाली उगले यांनी केली.

१६ जणांवर तडीपारची कारवाई
दरम्यान, सन २०२६ मध्ये चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ व ५७ अन्वये १६ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांना तडीपार करण्यात आले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर यापुढेही सातत्याने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.