लातूर गुन्हा

३२ गुन्ह्यांतील कुख्यात मुख्य आरोपी जेरबंद!

Latur crime: लातूर पोलिसांनी लातूरसह धाराशिव, सोलापूर व कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात 32 गुन्ह्यातील कुख्यात मुख्य आरोपीला जेरबंद केले. आरोपीकडून चोरीचे माल व रोख रक्कम जप्त.

३२ गुन्ह्यांतील कुख्यात मुख्य आरोपी जेरबंद!

Latur crime

आंतरराज्य सराईत टोळीकडून लाखो रुपयांच्या चोरीचा पर्दाफाश!

लातूर (Latur crime) : लातूरसह शेजारील धाराशिव, सोलापूर व कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात मागील दीड ते दोन वर्षांपासून घडणाऱ्या घरफोडी व चोरीच्या 32 गुन्ह्यातील कुख्यात मुख्य आरोपीला जेरबंद करण्यास लातूर पोलिसांना यश आले आहे. बंद घरांचे कुलूप तोडून मौल्यवान दागिने व रोख रक्कम चोरी करणारी ही टोळी अत्यंत चलाख पद्धतीने गुन्हे करीत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.

पोलीस अधीक्षक, अमोल तांबे  लातूर यांच्या सूचनांनुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने  राबविलेल्या विशेष कारवाईत या गुन्हेगारी टोळीतील मुख्य व कुख्यात आरोपीस अटक करण्यात यश मिळवले. (Latur crime) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे दि. २४ एप्रिल २०२६ रोजी उजनी येथील उड्डाणपुलाखाली सापळा रचून सुनिल उर्फ काळ्या श्रावण शिंदे (वय २४ वर्षे, रा. सुंभा, ता. जि. धाराशिव) हा रेकॉर्डवरील व फरार असलेल्या आरोपीला ताब्यात जेरबंद केले.

आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पथकाने तत्परतेने त्यास पकडले. आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ३ ग्रॅम वजनाची सोन्याची ठुशी रोख रक्कम ₹५,०००/- असा एकूण ₹३५,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीने आपल्या साथीदारांसह लातूर, धाराशिव, सोलापूर तसेच कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली. ही टोळी नियोजनबद्ध पद्धतीने वाहनांचा वापर करून रात्रीच्या वेळी बंद घरे हेरून चोरी करत असल्याचे उघड झाले आहे.

गुन्ह्याच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता...

आरोपी विरुद्ध लातूर जिल्ह्यात (Latur crime) भादा, किल्लारी, कासारशिरसी, औसा, लातूर ग्रामीण व इतर पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी व चोरीचे एकूण २८ गुन्हे दाखल आहेत. धाराशिव जिल्हा ४ गुन्हे, सोलापूर जिल्हा ५ गुन्हे आणि कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात ३ गुन्हे दाखल आहेत. तपासादरम्यान गुन्ह्याच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यातील आरोपीने त्याच्या इतर साथीदारासह टोळी तयार करून  गुन्हे केल्याची कबुली दिली आहे असून त्याच्या टोळी मधील काही आरोपींना या अगोदरच अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

यांनी केली कामगिरी...

सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशावरून अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ,  पोलीस अमलदार माधव बिल्लापटे, नवनाथ हासबे, रामलिंग शिंदे, तुराब पठाण, राजेश कंचे, गणेश साठे, श्रीनिवास जांभळे, शैलेश सुडे, महिला पोलीस अंमलदार अंजली गायकवाड यांचे पथकाने अत्यंत समन्वय व कौशल्य दाखवत ही कारवाई यशस्वी केली.

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
अवैध कोळसा चोरीचा ट्रक पकडुन कन्हान पोलिसांनी केली कारवाई

अवैध कोळसा चोरीचा ट्रक पकडुन कन्हान पोलिसांनी केली कारवाई

Kanhan illegal coal theft: अवैध कोळसा वाहतुकी विरोधात कन्हान पोलिसांनी धडक कारवाई करित कोळशाने भरलेला संशयित ट्रक जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिस रातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ

Oct 05, 2026
दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

समस्तीपूरमध्ये वडिलांच्या हत्येनंतर ‘दृश्यम’ स्टाईलने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवशंकर सहनीला सूरतमधून अटक.

Oct 04, 2026
मुंबईच्या ३४% पाण्याची गळती-चोरीत नासाडी; गारगाई धरणाएवढ्या तीन धरणांचे पाणी वाया

मुंबईच्या ३४% पाण्याची गळती-चोरीत नासाडी; गारगाई धरणाएवढ्या तीन धरणांचे पाणी वाया

मुंबईत रोज १,३९० दशलक्ष लिटरहून अधिक पाणी गळती, चोरी आणि अनधिकृत वापरामुळे वाया जाते. गारगाईसारख्या तीन धरणांच्या क्षमतेइतकी ही नासाडी आहे.

Oct 03, 2026
परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026