जिंतुर घरफोडी गुन्हा

परभणीतील जिंतुरात घरफोडी...दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

Jintur Burglary Case: जिंतुरातील घरफोडीच्या घटनेत, देवदर्शनासाठी यांच्या तुळजापूरला गेल्यानंतर अनोळख्या चोरांनी २.५ लाखांचा मुद्देमाल खाली लावलेला आहे.

परभणीतील जिंतुरात घरफोडी...दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

Jintur Burglary Case

 

देवदर्शनासाठी गेलेल्यांच्या बंद घरावर चोरट्यांनी मारला डल्ला

जिंतूर (Jintur Burglary Case) : घराला कुलूप लावून तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेलेल्या लिपिकाचे घर फोडत चोरट्यांनी २ लाख  ५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना जिंतूर शहरातील खैरी प्लॉट भागात घडली. सदर प्रकरणी १४ जुनला (Jintur Burglary Case) जिंतूर पोलिसात अनोळखी चोरट्यांवर गुन्हा नोंद झाला आहे. 

प्रशांत सुधाकरराव लाखे हे बहिण, भाऊजी आणि परिवारासह देवदर्शनासाठी तुळजापूरला गेले होते. १३ जुनच्या मध्यरात्री एकच्या सुमारास ते देवदर्शनाहून परत आले. यावेळी त्यांना घराच्या खोल्यांचे दरवाजे उघडे दिसले. आत जावून पाहणी केल्यावर साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. (Jintur Burglary Case) चोरट्यांनी घरातून सोन्याचे झुंबर, सोन्याची वेल, रोख रक्कम मिळून २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे दिसून आले. या प्रकरणी अनोळखी चोरट्यांवर जिंतूर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित सामग्री

मानोरा येथील ज्वेलर्स दुकानात मध्यरात्री चोरीचा प्रयत्न फसला!

मानोरा येथील ज्वेलर्स दुकानात मध्यरात्री चोरीचा प्रयत्न फसला!

Jewelers shop theft: मानोरा शहरातील डिग्रस चौक येथील शहाणे ज्वेलर्स दुकानात अज्ञात ४ चोरट्यांनी मध्यरात्री गॅस कटरच्या साहाय्याने चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना

Aug 30, 2026
आधी दर्शन अन् मग दानपेटीवर हात साफ!

आधी दर्शन अन् मग दानपेटीवर हात साफ!

Sai Temple Theft Case: आधी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घ्यायचे आणि त्यानंतर लगेच मंदिराची दानपेटी फोडून रोकडसह मौल्यवान ऐवज लंपास करायचा, असा धक्कादायक प्रकार

Jul 20, 2026