अवैध गुटखा गुन्हे

पंधरवाड्याच्या मोहीमेत जिल्ह्यात अवैध गुटख्याचे केवळ ३ गुन्हे

Illegal Gutkha Crime: हिंगोलीत एकूण २६८ गुन्हे दाखल झाल्याचे दाखवले असले तरी त्यातील वास्तव पाहता जिल्ह्यात अवैध गुटख्याचे केवळ तीन गुन्हे दाखल होणे ही बाब नवलाईचीच ठरतेय.

पंधरवाड्याच्या मोहीमेत जिल्ह्यात अवैध गुटख्याचे केवळ ३ गुन्हे

Illegal Gutkha Crime

 

अवैध धंद्याच्या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी नगण्य

हिंगोली (Illegal Gutkha Crime) : नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी 'अवैध व्यवसाय निर्मूलन मोहीम-३' चा हिंगोली जिल्ह्यात चांगलाच फज्जा उडाला आहे. पंधरवड्यात (१ ते १५ सप्टेंबर २०२६) हिंगोलीत एकूण २६८ गुन्हे दाखल झाल्याचे दाखवले असले तरी त्यातील वास्तव पाहता जिल्ह्यात अवैध गुटख्याचे केवळ तीन गुन्हे दाखल होणे ही बाब नवलाईचीच ठरतेय.  विशेष म्हणजे अवैध धंद्यावरील कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी नगण्य ठरतेय. आयजीच्या पथकाने हिंगोलीत येऊन अवैध जुगारावर छापा मारणे ही बाब मात्र नवलाईचीच ठरतेय.

 जिल्ह्यातील अवैध धंद्याचे (Illegal Gutkha Crime) समुळ उच्चाटन करण्याचा विडा नांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी उचलला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मध्यंतरी त्यांच्या पथकाने अवैध जुगारावर कारवाई करून तब्बल १८ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करून २३ आरोपीवर गुन्हे दाखल केले होते. परंतु जिल्हा पोलिसांची कामगिरी मात्र म्हणावी तशी समाधानकारक दिसून  येत नाही. जिल्ह्यात गुटख्यावर फक्त ३ गुन्हे, ६४ हजाराचा मुद्देमाल आणि ४ आरोपींवर कारवाई. जिल्ह्यात सर्रास विकला जाणारा गुटखा, पानटपर्‍यांवर उघडपणे मिळतोय, तरी कारवाई फक्त ३ हा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह आहे.

मटका-जुगारावर २५ गुन्ह्यात ३० लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त आणि ९९ आरोपी, तर अवैध दारू विक्रीवर १५९ गुन्हे. म्हणजे हिंगोलीत दारू आणि जुगार राजरोस सुरू आहे हे पोलिसांनीच मान्य केले आहे. शस्त्र अधिनियमान्वये तर केवळ ३ गुन्हे आणि १३०० रुपयांचा मुद्देमाल - म्हणजे नगण्य कारवाई. सगळ्यात मोठा धक्का म्हणजे 'इतर केसेस' मध्ये ७८ गुन्ह्यात तब्बल १ कोटी ७ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. इतका मोठा आकडा असूनही नेमकी कोणत्या व्यवसायावर कारवाई केली, हे गुलदस्त्यात आहे. एकंदरीत, परिक्षेत्रात ९२२ गुन्ह्यात १० कोटी १६ लाखांचा मुद्देमाल जप्त झाला असताना हिंगोलीचा वाटा अत्यल्प आहे. मोहीम राबवायची म्हणून राबवली, आकडे दाखवायचे म्हणून दाखवले, अशीच परिस्थिती हिंगोली पोलिसांची दिसून येत आहे.

टैग्स: Illegal Gutkha Crime