तलवार हल्ला मृत्यू

परभणीत गोगलगावच्या तलवार हल्ल्यातील जखमीचा मृत्यू..?

Sword Attack Death: गोगलगाव, मानवत तालुक्यातील तलवार हल्ल्यात गंभीर जखमी विष्णू पाथरकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हल्ला जुन्या भांडणावर आधारित होता. पोलिसाने गुन्हेगारांचे नाव नोंदले आहे.

परभणीत गोगलगावच्या तलवार हल्ल्यातील जखमीचा मृत्यू..?

Sword Attack Death

 

जुन्या वादातून झाला होता हल्ला; पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार

परभणी (Sword Attack Death) : मानवत  तालुक्यातील गोगलगाव येथे जुन्या वादातून तलवार, लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यातील एका गंभीर जखमीवर परभणीत उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान सोमवार ८ जून रोजी जखमीचा मृत्यू झाला. विष्णू पाथरकर, असे मयताचे नाव आहे. मंगळवार ९ जून रोजी पोलीस बंदोबस्तात मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. 

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मानवत तालुक्यातील गोगलगाव येथे जुन्या भांडणाच्या कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवत ४ जून रोजी तलवार, लोखंडी रॉडने तिघांवर हल्ला करण्यात आला. सदर प्रकरणात मानवत पोलिसात गुन्हा दाखल झाला. या (Sword Attack Death) हल्ल्यामध्ये विष्णू पाथरकर हे जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारा दरम्यान सोमवार ८ जून रोजी विष्णू पाथरकर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युची माहिती गोगलगाव येथे पोहोचताच गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मंगळवार ९ जून रोजी पोलीस बंदोबस्तात मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या (Sword Attack Death) प्रकरणात गोपाल मगर, अजय उर्फ अदिनाथ मगर, कृष्णा मगर, नवनाथ मगर, आबासाहेब मगर, मनकर्णा मगर व सिमा यांच्यावर गुन्हा नोंद आहे. प्रकरणाचा तपास सपोनि. दर्शन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

संबंधित सामग्री

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026