घोट पोलिस कारवाई

कत्तलीसाठी नेले जाणारे 27 जनावरे घोट पोलिसांच्या ताब्यात...

Ghot police action: घोट पोलिसांनी आज पहाटे तीन आरोपींना अटक केली, जे 27 जनावरांना कत्तलीसाठी नेले जात होते. त्यातील 3 जनावरे दगावली. घटनेची पुढील तपास सुरू आहे.

कत्तलीसाठी नेले जाणारे 27 जनावरे घोट पोलिसांच्या ताब्यात...

Ghot police action

तीन आरोपी जेरबंद; 27 पैकी 3 जनावरे दगावली...

घोट/गडचिरोली (Ghot police action) : चामोर्शी तालुक्यातील घोट परिसरातील अनंतपुर येथुन कत्तलीसाठी नेली जात असलेली 27 जनावरे घोट पोलिसांनी आज पहाटे 5 च्या सुमारास 3 आरोपीना 
ताब्यात घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.

प्राप्त माहीतीनुसार या ऑयशर वाहन क्र. एम एच 34 बि. झेड 3509 मध्ये आरोपी नामे मोहम्मद मासूमअली मोहमंद सरवर वय 44 वर्षे रा.राजुरा अमरसिंग धरमदास धोती रा. अनंतपुर व निहाल शिवराम लाडसे वय. 30 वर्षे रा लक्कडकोट ता. राजुरा जि. चंद्रपुर प्रकरणी या 3 आरोपीना (Ghot police action) घोट पोलीसांनी अटक केली आहे.घोट पोलीस मदत केन्द्रांचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी गोपनीय माहिती आधारे काही व्यक्ती जनावरे घेऊन जात आहेत. सदर माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ स्थानिक  संबंधित परिसरात गस्त घातली.शोधमोहीम राबवित असताना 3 व इतर संशयित व्यक्ती 27 जनावरे घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले.

आरोपीना तात्काळ ताब्यात घेण्यात आले तसेच घटनास्थळी पाळत ठेवण्यासाठी वापरलेली  2 वाहने जप्त करण्यात आली. अशा एकंदरीत 24 लाख 25 हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त केला. (Ghot police action) घटनेची तपास प्रभारी अधिकारी किशोर शिंदे यांच्या मागदर्शनात सहाय्यक फौजदार दुलांल मंडल करित आहे. घोट पोलिसांनी संबंधितांविरुद्ध प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा व इतर लागू कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.24 जनावरांना सायंकाळी चामोशी येथील गोशाळेत पाठविण्यात आले.सदर गोतस्करांना चामोर्शी न्यायालयात हजर करण्यात आले.चामोर्शी न्यायालयाने सदर आरोपींना 7 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026