डोंगरकडा (Devwadi gambling raid) : देववाडी शिवारात फिरत्या जुगारावर छापा मारून गुन्हा दाखल केला. येथून जवळच असलेल्या देववाडी शेतशिवारात राघोजी बुलबुले यांचे शेताजवळ १७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास कॅनॉल लगत असलेल्या आंब्याच्या झाडाखाली फिरता जुगार अड्ड्यावर डोंगरकडा पोलीस चौकीचे जमादार संतोष नागरगोजे, विठ्ठल जाधव यांच्या पथकाने छापा मारून चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नगदी रुपये व दोन मोटारसायकल सह ४४२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी चार जणांवर (Devwadi gambling raid) गुन्हा दाखल करण्यात आला. इतर चार ते पाच जण पळून जाण्यात यशस्वी ठरले त्यांचा शोध सुरू आहे. या छाप्यात राजकुमार खंडोजी ठाकरे, लक्ष्मण खंडोजी ठाकरे, श्रावण रामराव इंगळे रा. देववाडी, प्रल्हाद रुखमाजी खुडे रा. कुंभारवाडी यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद मरे यांचे मार्गदर्शना खाली सुरू आहे.