३ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त
वाकोडी येडोबा (Kalamnuri Gambling Raid) : कळमनुरी तालुक्यातील वाकोडी आबादानी येथे पाण्याच्या टाकीजवळ सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर कळमनुरी पोलिसांनी धाड टाकली. ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास वाकोडी येथील बंडू दत्तराव चिलकर यांच्या घराच्या पाठीमागील लाकडी शेडमध्ये काही जण झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने सदर ठिकाणी छापा मारला. या (Kalamnuri Gambling Raid) कारवाईत शाम संभाजी इंगळे, नारायण पांडुरंग मासोळकर, बाळू नारायण ठाकरे, मारोती केशव जाधव, बंडू दत्तराव चिलकर सर्व रा. वाकोडी या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी घटनास्थळा वरून नगदी १६०० रुपये, ३ मोबाईल, मोटार सायकल क्रमांक एमएच ३८ एएल ७२२८, एमएच २० एफसी ३५८९, एमएच १२ एडी २९२२, एमएच ३८ एस ८७९९ अशा ६ मोटारसायकल आणि ५२ पत्ते असा एकूण ३ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Kalamnuri Gambling Raid) याप्रकरणी पोलीस ठाणे कळमनुरी येथे मटका जुगार कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. ही कामगिरी पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक मदन गव्हाणे, कैलास गुंजकर, वाघ आदींनी केली आहे.