समगा रेल्वे महिला मृतदेह

समगा रेल्वे पुलाखाली संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Railway Woman Dead Body: हिंगोली तालुक्यातील समगा येथील रेल्वे पुलाच्या खाली संशयास्पद अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार..

समगा रेल्वे पुलाखाली संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Railway Woman Dead Body

 

परिसरात उडाली खळबळ

खानापूर चित्ता (Railway Woman Dead Body) : हिंगोली तालुक्यातील समगा येथील रेल्वे पुलाच्या खाली संशयास्पद अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील समगा येथील रेल्वे पुलाखाली 29 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास एका अनोळखी महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ  घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. सदरील मृत अवस्थेत सापडलेली महिलेचे नाव दिव्या सुचित स्वामी वय अंदाजे 35 वर्षे असे असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.

मृत झालेली महिला (Railway Woman Dead Body) घटस्फोटीत असून ती २०१८ पासून सुराणा नगर येथे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 मधील आपला भाऊ दीपक गणेश स्वामी याच्या  सोबत राहत असल्याचे प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली.  सासर कडून घटस्फोट झाला तेव्हापासून दिव्या स्वामी ह्या भावाकडे राहत होत्या. सदरील घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वगे, बीट अमलदार शंकर गायकवाड व पोलीस कर्मचारी यांच्यासह पोलिसाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सदरील घटना स्थळाची  पाहणी करून कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.

मृतदेह शवविच्छेदनासाठी हिंगोलीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.सदरील महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हा अपघात आहे की, अन्य काही कारण आहे. याबाबत अद्यापही अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. तपासांतीच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे . सदर प्रकरणात माहिती घेईपर्यंत हिंगोलीत ग्रामीण पोलिसात नोंद झाली नव्हती.