औंढा नागनाथ (Aundha Nagnath accident) : औंढा नागनाथ ते वसमत जाणार्या मार्गावर औंढा नागनाथ जवळील खांडेश्वरी देवी मंदिराजवळ छोटा हाती वाहन व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १५ एप्रिल बुधवार रोजी घडली आहे.
या (Aundha Nagnath accident) अपघातात गजानन मंचकराव कदम (२३) रा. वगरवाडी, सुरज बाळासाहेब उबाळे (२६) रा. वगरवाडी असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत ते दुचाकी क्रमांक एमएच २२ बीजे १४९७ या दुचाकीवरून औंढा नागनाथ कडे येत होते याच दरम्यान शिरड शहापूर कडे हळदीचा कोचा घेऊन जाणारा छोटा हाती क्रमांक एमएच २६ एच ९५४६ या वाहनाचा खांडेश्वरी देवी मंदिराजवळ भीषण अपघात होऊन यामध्ये गजानन कदम, सुरज उबाळे रा. वगरवाडी तर छोटा हाती वाहन चालक नवनाथ पुरभाजी कराळे (३५) रा. डिग्रस कर्हाळे हे गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जी.एस. राहीरे, उपनिरीक्षक शेख खुद्दूस, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कानगुले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंजाब थिटे, जमादार वसीम पठाण, शाहेद सय्यद, सुभाष जैताडे बबन चव्हाण, वाहतूक पोलीस वसंत चव्हाण, महामार्ग पोलीस खयामोद्दीन खतीब, राजाराम कदम, कैलास आडे, प्रमोद थोरात यांच्यासह जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने (Aundha Nagnath accident) अपघातग्रस्त रुग्णासाठी मोफत सुरू असलेली रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचली यानंतर आजूबाजूच्या नागरिकाच्या मदतीने अपघातग्रस्तांना तात्काळ औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून गजानन कदम व सुरज उबाळे यांना मयत घोषित केले तर नवनाथ कर्हाळे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
छोटा हत्ती व दुचाकीच्या भीषण अपघातात दोन ठार; एक जखमी
Aundha Nagnath accident: औंढा नागनाथ ते वसमत मार्गावर झालेल्या अपघातात छोटा हाती वाहन आणि दुचाकीच्या धडकेत दोन जण ठार झाले तर एकाची प्राणघातक जखम झाली
Aundha Nagnath accident
संबंधित सामग्री
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ
Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..
मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार
Mini Truck-Motorcycle Accident: शहरातून जाणाऱ्या हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर ग्रीनपार्कजवळ सोमवारी (दि. ५) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मिनीडोर आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.
माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये
Livestock Electric Accidental Death: महावितरणच्या विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र किंवा अन्य विद्युत उपकरणांमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.
वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!
मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.