विनायक तायडे जिल्ह्यात प्रथम

नवोदय परीक्षेत वरखेडा जि.प. शाळेचा झेंडा उंचावला

सेनगाव तालुक्यातील वरखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा उज्ज्वल विद्यार्थी विनायक शंकर तायडे याने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत ९८.७५ गुणांसह हिंगोली जिल्ह्यात प्रथम

नवोदय परीक्षेत वरखेडा जि.प. शाळेचा झेंडा उंचावला

Navodaya Exam

सेनगाव (Navodaya Exam) : सेनगाव तालुक्यातील वरखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा उज्ज्वल विद्यार्थी विनायक शंकर तायडे याने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत ९८.७५ गुणांसह हिंगोली जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या दैदिप्यमान यशामुळे शाळेचा, गावाचा आणि तालुक्याचा मान उंचावला असून सर्वत्र त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अत्यंत स्पर्धात्मक मानल्या जाणाऱ्या नवोदय परीक्षेत (Navodaya Exam) अव्वल स्थान मिळवणे ही मोठी कामगिरी मानली जाते. विनायकच्या या यशामागे त्याची जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि अथक परिश्रम महत्त्वाचे ठरले आहेत. त्याच्या यशामुळे शाळेतील शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल सरनाईक तसेच शिक्षक रवि खोटे, निलेश कपटकर, पुरुषोत्तम नारायण आहेर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  राधेशाम  सावंत सरपंच गजानन  सावंत, यांनी विनायकचे कौतुक केले.

“त्याची मेहनत, चिकाटी आणि अभ्यासू वृत्ती इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे,” असे सांगितले. पालक शंकर तायडे यांनी ही मुलाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत भविष्यात तो आणखी मोठी भरारी घेईल, असा विश्वास व्यक्त केला. विद्यार्थी विनायक तायडे याच्या या यशामुळे वरखेडा जि.प. शाळेचा लौकिक वाढला असून, त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

संबंधित सामग्री

नवोदय परीक्षेत उत्तीर्ण श्रवण शिवाजी ठाकरे याचा जिल्हा परिषद शाळा धामणी मानोरा येथे सत्कार

नवोदय परीक्षेत उत्तीर्ण श्रवण शिवाजी ठाकरे याचा जिल्हा परिषद शाळा धामणी मानोरा येथे सत्कार

Shravan Shivaji Thackeray: नवोदय परीक्षेत पात्र ठरलेला श्रवण शिवाजी ठाकरे यांचा सत्कार समारंभ दिनांक २७ मार्च रोजी जिल्हा परिषद शाळा धामणी मानोरा येथे घेण्यात आला.  

Mar 27, 2026