Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > करीअर

बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा

उत्तुंगतेज बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Pediatric Competitive Examination: शेलसूरच्या शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थिनी समृद्धी शिंदेने उत्तुंगतेज फाउंडेशनच्या उत्तुंगतेज यूथ सायंटिस्ट्स कॉम्पिटिशनमध्ये इस्रो अभियानासाठी निवड मिळवली.


उत्तुंगतेज बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Pediatric Competitive Examination |


समृद्धी शिंदेची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड; राज्यात 8 वा क्रमांक

जवळाबाजार/ हिंगोली (Pediatric Competitive Examination) : येथील उत्तुंगतेज फाउंडेशनतर्फे आयोजित उत्तुंगतेज यूथ सायंटिस्ट्स कॉम्पिटिशन परीक्षा (UYSC Exam) 2026 मध्ये श्री शिवाजी हायस्कूल, शेलसूर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या (Pediatric Competitive Examination) स्पर्धा परीक्षेसाठी शाळेतील एकूण 34 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 18 विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. विशेष बाब म्हणजे इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी समृद्धी दत्तात्रय शिंदे हिने राज्यस्तरावर इयत्ता 8 वी ते 10 वी गटामध्ये 8 वा क्रमांक (State Rank 8) मिळवत इस्रो (ISRO) अभ्यास दौऱ्यासाठी निवड होण्याचा मान मिळविला आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळा, पालक, शिक्षक तसेच परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करून त्यांना संशोधन व वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे प्रेरित करण्यासाठी उत्तुंगतेज फाउंडेशन सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. या यशामुळे संस्थेच्या कार्याला आणखी बळ मिळाले असून भविष्यातही विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संधी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे.

या (Pediatric Competitive Examination) यशामागे विद्यार्थ्यांचे परिश्रम आणि मार्गदर्शक शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. विशेषतः सौ. लहाने मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दिलेले सातत्यपूर्ण मार्गदर्शन, विज्ञान विषयाबाबत निर्माण केलेली आवड आणि स्पर्धा परीक्षेसाठी घेतलेले विशेष प्रयत्न यामुळे विद्यार्थ्यांना हे यश संपादन करता आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या योगदानाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

समृद्धी शिंदेची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी झालेली निवड ही शाळा आणि परिसरासाठी अभिमानाची बाब मानली जात असून, यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक तसेच उत्तुंगतेज फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.