Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > करीअर

टीईटी पेपर फुटला

टीईटी घोटाळ्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे बोंबा बोंब आंदोलन

TET paper leaked: नीट पाठोपाठ रविवार रोजी होणारा शिक्षक भरती परीक्षेचा टीईटीचा पेपर देखील फुटला असून परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या निषेधार्थ खा. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनात


टीईटी घोटाळ्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे बोंबा बोंब आंदोलन

TET paper leaked |

नांदेड (TET paper leaked) : नीट पाठोपाठ रविवार रोजी होणारा शिक्षक भरती परीक्षेचा टीईटीचा पेपर देखील फुटला असून परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या निषेधार्थ खा. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आणि उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे व महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार यांच्या नेतृत्वात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवार (ता.२७) रोजी आयटीआय चौक येथे बोंबा बोंब आंदोलन करण्यात आले.

नीट पाठोपाठ टीईटीचा पेपर फुटला (TET paper leaked) आहे. वारंवार पेपर फुटीतून सरकारचे अपयश अधोरेखित होत आहे. यातून परिक्षार्थीचे वर्ष किंबहुना आयुष्य बरबाद होत असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे व महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार यांनी केला. यावेळी सरकार विरोध बोंबा मारुन निषेध करण्यात आले.

यावेळी डॉ. श्रावण रँपनवाड, सुरेंद्र घोडजकर, नागराज सुलगेकर, कुमार कुर्तडीकर, सुरेश हाटकर, गगन यादव, शंकर शिंदे, बापूसाहेब पाटील, संजय वाघमारे, अक्षय नळगे, गणेश कोकाटे, सजेतसिंग ढिंल्ले, प्रविण कानघुले, अमरजित सिंग बुटर, रवी कल्याणकार, ज्योती कदम, जेशिका शिंदे, सुरेखा वैद्य, किरण पडलवार, तुषार देशमुख, अझर शेख, प्रसेनजित वाघमारे, सचिन टाले, गजानन जाधव, प्रकाश दिपके, प्रबुद्ध चित्ते, संजय कोठेकर, कलिम शेख, गौतम सिरसाट, शेख नईम आदीसह इतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.