राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

चिखली–बुलढाणा–मलकापूर रस्ता नॅशनल हायवेकडे हस्तांतरित करण्याची मागणी

National Highway Authority: चिखली–बुलढाणा–मलकापूर हा महत्त्वाचा राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात यावा, अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कराळ यांच्या नेतृत्वाखाली

चिखली–बुलढाणा–मलकापूर रस्ता नॅशनल हायवेकडे हस्तांतरित करण्याची मागणी

National Highway Authority

 

अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे युवासेनेचे निवेदन; आंदोलनाचा इशारा

चिखली (National Highway Authority) : चिखली–बुलढाणा–मलकापूर हा महत्त्वाचा राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात यावा, अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कराडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सन २००६ मध्ये सुमारे ३७७ कोटी रुपये खर्चून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे बांधकाम केले होते. सन २००८ मध्ये रस्त्याचे काम पूर्ण झाले. मात्र वाढती लोकसंख्या व वाहनांची संख्या लक्षात घेता हा ७१ किलोमीटर लांबीचा बी.ओ.टी. तत्त्वावरील रस्ता आता अपुरा ठरत असून अनेक ठिकाणी धोकादायक बनला आहे.
युवासेनेने निवेदनात नमूद केल्यानुसार, सन २०२१ ते २०२६ या कालावधीत केवळ २० किलोमीटरच्या चिखली–केळवद पट्ट्यात ५२ अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये ३८ जण जखमी झाले असून २८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी आणि प्रशासन यांची संयुक्त बैठक बोलावून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच चिखली–बुलढाणा–मलकापूर मार्ग राष्ट्रीय महामार्गात (National Highway Authority) समाविष्ट करून त्याचे रुंदीकरण व सुरक्षिततेची कामे तातडीने हाती घ्यावीत, असेही निवेदनात म्हटले आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शिवसेना व युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या मार्गाच्या प्रश्नावर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

या प्रमुख मागणीसाठी युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कराडे यांनी पाठपुरावा सुरू केला असून आजच्या आंदोलनामध्ये त्यांच्या सोबत तालुका प्रमुख किसन लाला धोंडगे उपजिल्हाप्रमुख विलास सुरडकर शहर प्रमुख श्रीराम झोरे,प्रितम गैची, शिवाजी पवार, रवि पटेकर,अनिल कराडे  प्रदीप वाघ, मनोहर शिंदे नारायण वाणी अशोक राजपूत सह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक तहसील कार्यालयासमोर आंदोलनात सहभागी झाले होते.

संबंधित सामग्री

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-361 वरील अपघात मालिका सुरूच!

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-361 वरील अपघात मालिका सुरूच!

National Highway Accident: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- 361 वरील भाटेगाव कालव्यावरील अपघाताची मालिका अखंड सुरूच आहे. पपई वाहतूक करणारे बुलेरो वाहन सायंकाळी पलटी झाले

Aug 30, 2026
मिसिंग लिंकवर पहाटे 1.20 वाजता भीषण अपघात; काँग्रेस कार्यकर्ता तुषार भूमकर यांचा मृत्यू

मिसिंग लिंकवर पहाटे 1.20 वाजता भीषण अपघात; काँग्रेस कार्यकर्ता तुषार भूमकर यांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमधील काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते तुषार भूमकर यांचा पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’वर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला.

Aug 07, 2026
मोहन भागवतांचा मोठा खुलासा; आरक्षण आणि Gen Z वर स्पष्ट भूमिका

मोहन भागवतांचा मोठा खुलासा; आरक्षण आणि Gen Z वर स्पष्ट भूमिका

RSS Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी आरक्षण, जनरेशन झेडची आंदोलने, शिक्षण व्यवस्था, शेजारी देशांशी संबंध आणि सामाजिक समस्यांवर मनमोकळेपणाने भाष्य केले.

Aug 07, 2026
धर्मवीर फाउंडेशनचा मलकापूर तालुक्यातही प्रवेश...

धर्मवीर फाउंडेशनचा मलकापूर तालुक्यातही प्रवेश...

Dharamveer Foundation: युवाशक्ती, समाजसेवा व राष्ट्रसेवा हा त्रिवेणीसंगम घेऊन चालणाऱ्या धर्मवीर युथ फाऊंडेशनने मलकापूर तालुक्यातील गावात निर्माण करून विविध ठिकाणी शाखांची स्थापना

Jul 17, 2026
गौळबाजार मध्ये दूषित पाण्याविरोधात युवकांचे अनोखे आंदोलन

गौळबाजार मध्ये दूषित पाण्याविरोधात युवकांचे अनोखे आंदोलन

Contaminated Water Protest: गौळबाजार येथे सतत दुरुस्ती आणि दुरगंधने नागरिकांना त्रास होण्याच्या समस्या झाल्याने युवकांनी पंचायतीच्या कार्यालयातून दूषित पाणीची मागणी केली.

Jul 14, 2026