मानोरा (International Yoga Day) : स्थानिक मातोश्री सुबद्राबाई पाटील कला, विज्ञान व कै. पांडुरंगजी ठाकरे महाविद्यालयात दि. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध योगासने व प्राणायाम करून योगाचे महत्त्व अधोरेखित केले.
या (International Yoga Day) कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे सचिव महादेवराव ठाकरे यांनी भूषविले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात योग हा निरोगी जीवनाचा पाया असून शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान इंगोले यांनी उपस्थितांना संबोधित करताना नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शांतता व कार्यक्षमतेत वाढ होते, असे सांगून दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी योगशिक्षक पंकज राऊत यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाच्या पद्धतींचे मार्गदर्शन केले. त्यांनी योगाचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्यावरील सकारात्मक परिणाम स्पष्ट करून नियमित योगाभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपस्थितांनी योगासने व प्राणायामाचा सराव केला.
शारीरिक शिक्षक प्रा. गजानन पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. किशोर कोपरकर व महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. स्नेहल ढवळे यांनी सहसंयोजक म्हणून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. कार्यक्रमात उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी संयोजकांचे अभिनंदन केले.
मा सु पा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
International Yoga Day: महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतनांनी आंतरराष्ट्रीय योग दिवसासाठी कार्यक्रम आयोजित केले. त्यामध्ये योगाचे शारीरिक, मानसिक व आत्मिक लाभ स्पष्ट
International Yoga Day
संबंधित सामग्री
श्री शिवाजी महाविद्यालय, एसपीएम महाविद्यालय व शिवाजी हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
International Yoga Day: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्थानिक शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय, एसपीएम महाविद्यालय आणि शिवाजी हायस्कूल, चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कन्हान येथे योगा मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रम
International Yoga Day: कामगार कल्याण मंडळाने नागपूरच्या कन्हान येथे आयोजित कार्यक्रमात योगाचा शारीरिक, मानसिक व आत्मिक लाभ दाखवला. स्नेहल राणे आणि शीला मेश्राम प्रमुख उपस्थीती.
आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; 'योग करा, निरोगी रहा'चा संदेश
आंतरराष्ट्रीय योग नगरपंचायत बिडगाव-पांढुर्णा-तारोडी खुर्द येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व तसेच 'निरोगी राहण्यासाठी योग्याचा अवलंब' करण्याचे आवाहन
निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाने रोज योगा करावा: आमदार संतोष बांगर
International Yoga Day: आंतरराष्ट्रीय योग दिवसावरील कार्यक्रमात आमदार संतोष बांगर यांनी सार्वजनिकांना नियमित योगासने करण्याचे आव्हान दिले. त्यांनी लहानपणापासून वयोवृद्धपर्यंत सर्वांसाठी योगा...
'एक पृथ्वी, एक आरोग्य आणि एक भविष्य' या संकल्पनेला स्व. माणिक पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
International Yoga Day: आंतरराष्ट्रीय योग दिवसाविषयी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांख्यिक्यावर उत्साहान्वित सहभाग घेतला. योगासाठी महत्वाचे महत्त्व, शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व