शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर एक लाख, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना दोन लाखांची मदत देण्याची मागणी
औसा (Ausa Women protest) : लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. पावसाअभावी शेतातील उभी पिके करपून गेली असून, कष्टाने पेरलेले सोयाबीन हातात येण्याआधीच उद्ध्वस्त झाले आहे. या (Ausa Women protest) पार्श्वभूमीवर लातूरसह मराठवाडा तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी औशात महिलांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
जिल्हा परिषद सदस्य दीपाली शाम भोसले यांच्या नेतृत्वाखाली दि. १५ सप्टेंबर रोजी (Ausa Women protest) औसा मोड ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. हातात करपलेले सोयाबीन घेऊन मोठ्या संख्येने महिला मोर्चात सहभागी झाल्या. ‘तात्काळ दुष्काळ जाहीर करा’, ‘शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर एक लाख रुपये मदत द्या’, ‘नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपये द्या’, ‘पिकांचे तातडीने पंचनामे करा’ अशा घोषणांनी औसा शहराचा परिसर दणाणून गेला.
यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे राजेंद्र मोरे, प्रहार संघटनेचे दत्ता आनंदगावकर, पप्पू भोसले, बबन भोसले, गणेश पाटील, काका पवार हरेगाव, कृष्णा जावळे,सयाजी दारफळकर, नेताजी भोसले, दयानंद भोसले, सरपंच सुजाता बनसोडे, पद्मिनी कोकासाहेब पवार, पार्वती सूर्यवंशी, अनुसया चव्हाण, सोनाली चव्हाण, जनाबाई चव्हाण, शमाबी शेख, जन्नतबी शेख, शामामबी चव्हाण, मंजुश्री चव्हाण, ऐशाळी शेख, सुनीता संजय चव्हाण, संगिता बनसोडे, सविता कांबळे, योगिता कांबळे, कस्तुराबाई मंगरुळे, गवळण मंगरुळे, रूपाली कांबळे, अंजना मंगरुळे, सुरेखा मंगरुळे, अनुसया वाघमारे, सुकमारबाई कांबळे, सुरेखा जाधव, भानीबाई कांबळे, अन्नपूर्णा कांबळे, रेखा कोव्हाळे, सचिता भेडाले, गिरिजा कोव्हाळे, बोपदी कोहाळे, लक्ष्मी कोव्हाळे, निमा कोव्हाळे आदीसह मोठया संख्याने शेतकरी उपस्थित होते.