परभणी विद्युत उपकेंद्र

परभणीतील रत्नेश्वर रामपुरी येथे संतप्त महिलांनी विद्युत उपकेंद्राला ठोकले कुलूप !

Parbhani Power Substation: परभणी जिल्ह्यातील रत्नेश्वर रामपुरी गावात महिलांनी स्वयंपाकाच्या वेळेत होणाऱ्या लोडशेडिंगविरोधात ३३ केव्ही विद्युत उपकेंद्रावर कुलूप ठोकली.

परभणीतील रत्नेश्वर रामपुरी येथे संतप्त महिलांनी विद्युत उपकेंद्राला ठोकले कुलूप !

Parbhani Power Substation

 

स्वयंपाकाच्या वेळेत वीज गायब; लोडशेडिंगविरोधात महिला संतप्त
महावितरण प्रशासनाची धावपळ; पाथरी पोलिसांनी मध्यस्थी...!

परभणी (Parbhani Power Substation) : पाथरी  तालुक्यातील रत्नेश्वर रामपुरी येथील  महिलांनी संध्याकाळच्या लोडशेडिंगविरोधात थेट ३३ केव्ही उपकेंद्रावर मोर्चा वळवत कुलूप ठोकल्याची  घटना मंगळवार २६ मे रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली . 

मिळालेल्या माहितीनुसार गावात सकाळी पाच ते नऊ आणि सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत लोडशेडिंग घेतले जात आहे. विशेषतः सायंकाळच्या स्वयंपाकाच्या वेळेत वीजपुरवठा खंडित होत असल्याने महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून याबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती. याच पार्श्वभूमीवर संतप्त २०० हुन अधिक महिलांनी एकत्र येऊन गावातील ३३ केव्ही उपकेंद्र गाठून तेथील ऑपरेटरसमोर आपल्या मागण्या मांडल्या. मात्र तत्काळ तोडगा न निघाल्याने महिलांनी उपकेंद्रालाच कुलूप ठोकत आंदोलन अधिक तीव्र केले.

दरम्यान स्थानिक कर्मचाऱ्यांकडून या प्रकाराची माहिती पाथरी येथील महावितरणच्या उपअभियंत्यांना देण्यात आल्यानंतर उपअभियंता डिग्रसकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र वातावरण तणावपूर्ण झाल्याने पाथरी पोलिसांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी भेट देत महिलांशी संवाद साधला. त्यांनी  (Parbhani Power Substation) आंदोलनकर्त्या महिलांची समजूत घालत उपकेंद्राला लावलेले कुलूप काढून घेतले. तसेच लोडशेडिंगच्या वेळापत्रकाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी बुधवार २७ मे रोजी ग्रामस्थांना पाथरी येथील महावितरण कार्यालयात बोलावण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

संबंधित सामग्री

बल्लारपूरमध्ये मुख्य मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

बल्लारपूरमध्ये मुख्य मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

Ballarpur Traffic Jam: बल्लारपूर शहरातील नगरपालिका चौक परिसरात राजुरा–चंद्रपूर मुख्य मार्गावर एक मोठे झाड अचानक कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. झाड रस्त्यावर आडवे पडल्यामुळे..

Jul 16, 2026