Washim Drought

पालकमंत्र्यांनी मदत जाहीर करूनच जिल्ह्याची सीमा ओलांडावी; परिवर्तन शेतकरी संघटनेची मागणी

मानोरा तालुक्यात पावसाच्या खंडामुळे पिकांचे नुकसान; वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी मदत देण्याची मागणी.

पालकमंत्र्यांनी मदत जाहीर करूनच जिल्ह्याची सीमा ओलांडावी; परिवर्तन शेतकरी संघटनेची मागणी

Washim Drought

मानोरा तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने शेतीसह ग्रामीण जीवन विस्कळीत; हेक्टरी तात्काळ मदतीसह चारा छावण्या आणि पाणीटंचाईचा कृती आराखडा जाहीर करण्याची मागणी

मानोरा :
दीर्घकाळ पावसाने दडी मारल्याने मानोरा तालुक्यातील शेती आणि ग्रामीण जनजीवनावर मोठे संकट निर्माण झाले आहे. सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी यांसह विविध पिकांचे नुकसान झाले असून आगामी काळात पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि शेतीसाठी पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केवळ पीक पाहणी न करता जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी परिवर्तन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी केली आहे.

पावसाचा प्रदीर्घ खंड आणि पिकांची झालेली नासाडी पाहता कृषिमंत्र्यांचा औपचारिक पीक पाहणी दौरा हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा प्रकार असल्याची टीका संघटनेने केली आहे. वाशिम जिल्हा आकांक्षित जिल्हा असून, त्याला दुष्काळग्रस्त घोषित करूनच पालकमंत्र्यांनी जिल्ह्याची सीमा ओलांडावी, अशी भूमिका मनोहर राठोड यांनी मांडली आहे.

दोन वर्षांत धोरणात्मक नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप

गेल्या दोन वर्षांत पालकमंत्र्यांकडून शेती आणि शेतीशी संबंधित समस्यांसाठी आवश्यक धोरणात्मक नियोजन करण्यात आले नाही, असा आरोप परिवर्तन शेतकरी संघटनेने केला आहे. पावसाने दीर्घकाळ खंड दिल्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी संकटात असतानाही महिनाभरानंतर पालकमंत्री दौऱ्यावर येत असल्याची खंत संघटनेने व्यक्त केली.

दुष्काळाच्या छायेत शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. काही ठिकाणी पिकांमध्ये ट्रॅक्टर चालवण्यास सुरुवात झाली असून जनावरे चरण्यासाठी शेतात सोडली जात आहेत. अशा परिस्थितीत कृषिमंत्र्यांकडून केवळ पीक पाहणी केली जात असल्याबद्दल संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.

सरसकट मदत आणि चारा छावण्यांची मागणी

वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देणे आवश्यक असल्याचे मनोहर राठोड यांनी म्हटले आहे. मागील तसेच चालू वर्षाच्या पीक विम्याचा लाभ पंचनाम्याच्या प्रक्रियेत न अडकवता सरसकट देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करणे, उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी कृती आराखडा तयार करणे आणि शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी मदत जाहीर करणे, हे सध्याच्या परिस्थितीत आवश्यक उपाय असल्याचे परिवर्तन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी सांगितले.

संबंधित सामग्री

विविध विभागांच्या प्रलंबित प्रकरणाचा सीईओ विवेक गायकवाड यांच्याकडून आढावा

विविध विभागांच्या प्रलंबित प्रकरणाचा सीईओ विवेक गायकवाड यांच्याकडून आढावा

Hingoli Water Scarcity Plan: जिल्हा परिषदेच्या सभागृहात ५ ऑक्टोबर सोमवार रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.बैठकीच्या प्रारंभी २ ऑक्टोबर रोजी घेण्यात आले

Oct 05, 2026
सरसकट ५० हजारांच्या मदतीसाठी सोयाबीन व शासन निर्णय होळी

सरसकट ५० हजारांच्या मदतीसाठी सोयाबीन व शासन निर्णय होळी

Soybeans Holi Andolan: शेतात करपलेले सोयाबीन बोंड्या विना वाळलेली पराटी (कापसाचे झाड) पाण्याविना फळधारणा न झालेल्या मुंग व उडीद,तूर या भयान अवस्थेत कर्जबजारी झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून फुटी कवडी..

Oct 05, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

Risod Taluka Water Scarcity: उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत चालल्याने रिसोड तालुक्यातील जलसाठ्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. वाढत्या तापमानामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत

Oct 04, 2026
बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे शंकर भारसाकळे यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत त्यांनी कर्ज आणि आर्थिक संकटाचा उल्लेख केल्याचे समोर आले.

Oct 03, 2026