Breaking News
  • दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
  • लखलख चमकणारा महाराष्ट्राचा एकमेव काचेचा गणपती पुण्यात!
  • धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम
  • मराठा बांधवांचा मुंबईकडे ‘गनिमी कावा’; धाराशिवमधून 5 हजार कार्यकर्ते जाणार
  • शिरूरमध्ये कांदा लागवडीला वेग; महिलांनी पावसासाठी घातले साकडे
  • मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम; सात लाख मराठा बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था
  • सुरगाणा तालुक्यातील शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी मशीन दाखल
  • अनेकांना कुणबी प्रमाणपत्र दिले - एकनाथ शिंदे
  • नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर शहर कडकडीत बंद

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

विष्णुपंत भुतेकर

दुष्काळाच्या सावटामुळे विष्णुपंत भुतेकर यांचा वाढदिवसाचे जाहीर कार्यक्रम रद्द!

Vishnupant Bhutekar: भूमीपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. विष्णुपंत भुतेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व जाहीर कार्यक्रम यंदा रद्द


दुष्काळाच्या सावटामुळे विष्णुपंत भुतेकर यांचा वाढदिवसाचे जाहीर कार्यक्रम रद्द 

Vishnupant Bhutekar |

 

वाढदिवस साधेपणाने साजरा होणार; संचालक रवींद्र चोपडे यांचे आवाहन

रिसोड (Vishnupant Bhutekar) : भूमीपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. विष्णुपंत भुतेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले जाणारे सर्व जाहीर व सामाजिक कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आले आहेत. परिसरात पावसाअभावी शेतकरी बांधव कोरड्या दुष्काळाच्या तीव्र संकटात सापडले असल्याने, बळीराजाच्या दुःखात सहभागी होत हा संवेदनशील निर्णय घेण्यात आला आहे.

​विष्णुपंत भुतेकर (Vishnupant Bhutekar) यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम, आरोग्य तपासणी शिबिरे व सत्कार सोहळ्यांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. मात्र, यंदा शेतात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने कोणताही उत्सव किंवा सोहळा साजरा न करण्याचा निर्णय भुतेकर यांनी घेतला आहे. त्यानुसार वाढदिवसानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम व आरोग्य शिबिरे रद्द करण्यात आली आहेत.

​वाढदिवसाच्या दिवशी केवळ शेतकरी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या शुभेच्छा व आशीर्वाद स्वीकारण्यासाठी भुतेकर हे दिवसभर कृषी उत्पन्न बाजार समिती, रिसोड येथे उपस्थित राहतील. सर्व हितचिंतक, कार्यकर्ते, संस्था व मित्रमंडळांनी या निर्णयाची नोंद घ्यावी; वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे हार-तुरे, स्वागत सोहळे किंवा डिजिटल फलक उभारू नयेत, असे आवाहन भूमीपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र चोपडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Related to this topic: