रिसोड (Village Employment Assistant Association) : ग्राम रोजगार सहाय्यक संघटना महाराष्ट्र राज्य कृती समिती यांच्या वतीने महाराष्ट्रभर ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेने 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पासून कामं बंद आंदोलन पुकारले आहे. 3 ऑक्टोबर 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना महाराष्ट्र सरकारने ग्राम रोजगार सेवक यांचे दोन जीआर पारित केले होते.
त्यामध्ये एक जीआर ग्राम रोजगार सेवक यांचे पदनाम बदलून ग्राम रोजगार सहाय्यक करणे तर दुसरा जीआर अतिशय महत्त्वाचा ग्राम रोजगार सहायक यांना आठ हजार रुपये मानधन व दोन हजार रुपये प्रवास भत्ता असे दहा हजार रुपये दरमहा देण्याचा तीन ऑक्टोबर 2024 ला जीआर पारित झाला होता. सदर जीआर हा अनेक दिवसापासून निघणे अपेक्षित असताना एवढे दिवस ग्राम रोजगार सहायक यांची शासनाने अद्यापही अंमलबजावणी न केल्याने शासनाने सदर जीआर निघाल्यानंतरही त्याची आज रोजी दोन वर्षे पूर्ण होऊनही अंमलबजावणी झाली नाही.
सदर जीआर ची अंमलबजावणी न झाल्यामुळे ग्रामरोजगार सहाय्यक यांच्या खात्यात दोन वर्षापासून मानधनाचा एक रुपयाही मिळाला नाही. नियमित टक्केवारीनुसार मिळणारे मानधनही सहा सहा महिने मिळत नाही. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र राज्य कृती समितीने 1 ऑक्टोबर तर काही जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायत मध्ये ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे.
सध्या परिस्थितीत दुष्काळ सदृस्य परिस्थिती असल्याने महाराष्ट्र शासनाने तात्काळ ग्रामरोजगार सहायक यांना मानधन अदा करून शेतकरी शेतमजुरांसाठी काम करण्याचा मार्गही मोकळा करून द्याव्या अशी मागणी शेतकरी शेतमजुरांकडून होत आहे . सध्या परिस्थितीत ग्राम रोजगार सहायकांना शेतकऱ्यांसाठी सिंचन विहिरी, फळबागा, घरकुल, शेततळे ,शेतीसंबंधीत विविध विकास कामे व मजुरांची जॉब कार्ड नोंदणी, अद्यावत रेकॉर्ड, कागदपत्रे सांभाळणे ,मजुरांची मजुरी घेणे ,ऑनलाईन ई मस्टर भरणे इत्यादी खूप मोठी कामे वाढल्याने मानधन मात्र वेळेवर मिळत नाही.
फिक्स मानधन लागू नाही त्यामुळे ग्राम रोजगार सहायक यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले असून विविध संघटना लोकप्रतिनिधी ग्राम रोजगार सहायक यांना पाठिंबा देत असून शासन मात्र कधी जागे होऊन ग्राम रोजगार सहायक यांना कामाचा मोबदला देणार असा सवाल रिसोड तालुका ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेने निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी पंचायत समिती रिसोड, तहसीलदार तहसील कार्यालय रिसोड, यांना निवेदन देऊन कळविले आहे. या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र अंभोरे त रिसोड तालुका संघटनचे अध्यक्ष गजानन बाजड,जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र अंभोरे, जिल्हा सहसचिव गजानन काठोळे ,तालुका सचिव अशोक तात्या सरकटे ,उपाध्यक्ष सदाशिव काष्टे,गजानन जाधव ,प्रकाश जुमडे ,गणपत गवळी ,अमोल देशमुख, रवी भुतेकर ,दत्ता साबळे , रवी दळवी यांच्यासह रिसोड तालुक्यातील ग्राम रोजगार सहायक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सहायक बांधव या संपामध्ये सहभागी आहेत.
शेतकरी शेतमजुरांसाठीच आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय. परंतु शासनाचे आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याने ज्या सरकारने जीआर काढला त्याचीच अंमलबजावणी होत नाही त्यामुळे आम्ही सरकारला फार काही न मागता त्यांनी काढलेल्या जीआरचीच अंमलबजावणी मागतोय तेही सरकार देण्यास तयार नाही. त्यामुळे सरकार जोपर्यंत शासन निर्णयाची अंमलबजावणी करत नाही. तोपर्यंत काम बंद आंदोलनाचा महाराष्ट्र राज्य कृती समितीने निर्णय घेतला आहे. त्यामध्ये रिसोड तालुका सहभागी आहे.
- जाननराव बाजड, तालुका अध्यक्ष, ग्राम रोजगार सहायक संघटना रिसोड