नागपूर/ पुणे (Vijay Vasade honored) : नुकतेच पुणे येथे विश्वबंधुता साहित्य परिषद व काषाय प्रकाशनाच्या वतीने एकदिवसिय साहित्य संमेलन स्वागताध्यक्ष शरयू पवार, संमेलनाध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, महाराष्ट्राचे लाडके कवी प्रा.चंद्रकांत दादा वानखेडे, प्रसिद्ध व्याख्याते सुभाष वारे, कविसंमेलनाध्यक्ष गझलकार विनोद सावंत, यांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात पार पडले,
विजय वासाडे (Vijay Vasade) यांनी अल्पवधीतच साहित्यक्षेत्रात आपली दखलपात्र उपस्थिती नोंदवली असून ते अक्षरक्रांती फाऊंडेशन, चारोळी मंच, साहित्य सेवा कलामंडळ, बांधिलकी प्रतिष्ठान या आघाडीच्या साहित्य संस्थात सक्रिय आहेत.त्यांनी आतापर्यंत नागपुरात जागर मायमराठीचा यां शीर्षकांतर्गत दोन साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले आहें. याप्रसंगी विजय वासाडे वं अन्य सर्व पुरस्कार्थी साहित्यिकांचे ज्येष्ठ कवी व समीक्षक प्रभाकर तांडेकर 'प्रदत्त', शंकर घोरसे, लीलाधर दवंडे, निकिता गावंडे, विद्या निनावे, हितेश गोमासे, राजेश माहूरकर, मोहन सोमलकर, राहुल गवस, सुभाष मानवटकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
प्रख्यात कवी, गझलकार विजय वासाडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विश्वबंधुता साहित्य पुरस्काराने सन्मानित
Vijay Vasade honored: प्रख्यात कवी व गझलकार विजय वासाडे यांना पुणे येथे आयोजित एकदिवसीय साहित्य संमेलनात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विश्वबंधुता साहित्य पुरस्काराने सन्मानित केले गेले.
Vijay Vasade
संबंधित सामग्री
मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AI, डिजिटल माध्यमे, OTT आणि सोशल मीडियातील मराठी कंटेंट वाढवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे निधन; वयाच्या 101व्या वर्षी मराठी भाषेच्या अभ्यासकाला अखेरचा निरोप
ज्येष्ठ अभ्यासक, लेखिका आणि शिक्षिका प्रा. यास्मिन शेख यांचे आज, 24 ऑगस्ट रोजी निधन झाले.
बुवा-बाबांकडून महिलांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण : प्रा. माधव बावगे
बुवाबाजी हा बिनभांडवली आणि बरकतीची खात्री असणारा धंदा आहे.
ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे निधन; मराठी साहित्यविश्वावर शोककळा
मराठी साहित्यविश्वातील ज्येष्ठ आणि मान्यवर साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे गुरुवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले.
'माझा पुतण्या एक दिवस भारताचा पंतप्रधान होईल'; बाळासाहेब फडणवीसांचा देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठा विश्वास
पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर आधारित 'देवाभाऊ' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांनी भावनिक आणि उल्लेखनीय वक्तव्य केले.