वसमत भूकंप

भूकंपाच्या धक्क्याने पुन्हा वसमत तालुक्याला हादरवले 

Wasmat Earthquake: सोमवार रात्र आणि मंगळवारी सकाळी वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे भारी धक्क्यांचा पुन्हा आगमन झाला. हे सलग दोन दिवसीय धक्के ग्रामीण जनता मध्ये चिंतेच्या स्थितीला प्रेरित करीत आहे.

भूकंपाच्या धक्क्याने पुन्हा वसमत तालुक्याला हादरवले 

Wasmat Earthquake

 

भूकंपाची मालिका बंद होणार कधी

वसमत (Wasmat Earthquake) : तालुक्यात सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याच्या आगमन झाले  एका पाठोपाठ एक सलग दोन दिवस भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने ग्रामीण भागातील नागरिक चिंतेत आहेत वारंवार भूकंप होतात चर्चा होते व पुन्हा दुसरे धक्के येईपर्यंत सर्व शांत राहते त्यामुळे ही भूकंपाची मालिका कधी बंद होणार हे समजण्यास मार्ग नाही. 

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे व परिसर भूकंपप्रवण क्षेत्र होऊन बसलेले आहे अधून मधून (Wasmat Earthquake) भूकंपाचे धक्के होतात लहान-मोठे असे अनेक धक्के आजवर झालेले आहेत सोमवारी रात्री सौम्य भूकंपाचा धक्का पांगरा शिंदे व परिसरात जाणवला. त्यानंतर मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का झाल्याने नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले सलग दोन दिवस भूकंपाने हलवल्याने यातून काही विपरीत घटना होण्याची शक्यता आहे किंवा कसे या संदर्भात ग्रामस्थांत विचार मंथन सुरू झाले.

मात्र नेहमीप्रमाणे प्रशासनाने घाबरू नका असे संदेश पाठवले व पुन्हा पहिल्यासारखे भूकंप विसरून नागरिक ग्रामस्थ कामाला लागले. वारंवार होणाऱ्या या भूकंपाच्या धक्क्यातून निसर्ग काही संदेश देतो आहे का याचा विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे.