इंधन टंचाईमुळे भाजीपाल्याचे दर भिडले गगनाला

शहरातील भाजी मंडईत भाजीपाल्याची आवक घटल्याने तसेच इंधन दरवाढीचा परिणाम बाजारभावावर होत असून भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत.

इंधन टंचाईमुळे भाजीपाल्याचे दर भिडले गगनाला

Vegetable Price Hike

भाव दुप्पट-तिप्पट झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले; धान्य व खाद्यतेलही महागले

हिंगोली (Vegetable Price Hike) : शहरातील भाजी मंडईत भाजीपाल्याची आवक घटल्याने तसेच इंधन दरवाढीचा परिणाम बाजारभावावर होत असून भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. दहा रुपये किलो दराने मिळणारे टोमॅटो आता ३० ते ४० रुपये किलो झाले आहेत, तर १५ ते २० रुपये पाव मिळणारा शेवगा ३० ते ४० रुपये पाव दराने विकला जात आहे.

हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौक परिसरातील मुख्य भाजीमंडईत गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे स्थानिक शेतमालाचे उत्पादन घटले असून परजिल्ह्यातून येणारा भाजीपाला महाग झाल्याने किरकोळ बाजारातील दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

मेथी आणि कोथिंबिरीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले असून प्रतिजुडी २० ते ४० रुपये दराने विक्री होत आहे. इतर पालेभाज्यांचे दर स्थिर असले तरी प्रतिजुडी १० रुपये दर कायम आहे. फळभाज्यांच्या दरातही प्रतिकिलो ५ ते १० रुपयांची वाढ झाली आहे.

सध्या बाजारात कांद्याची पात १५ ते २० रुपये, पालक व अंबाडा १० रुपये जुडी, वांगी ५० ते ६० रुपये, दोडका ७० ते ८० रुपये, गवार ६० रुपये, कारले ५० ते ६० रुपये, टोमॅटो ३० ते ४० रुपये, कांदा १५ ते ३० रुपये, बटाटा २० ते ३० रुपये, लसूण १०० ते १८० रुपये, कोबी १० ते २० रुपये तर फुलकोबी १५ ते ३० रुपये किलो दराने विक्री होत असल्याची माहिती विक्रेते प्रल्हाद गिरी व सय्यद शौकत यांनी दिली.

व्यापाऱ्यांच्या मते, कडक उन्हाळ्यामुळे जिल्ह्यातील भाजीपाला पिके करपली असून स्थानिक आवक जवळपास निम्म्याने घटली आहे. परजिल्ह्यातून येणाऱ्या मालाचा वाहतूक खर्च वाढल्याने दर आणखी वाढले आहेत. “मागणी कायम आहे, पण माल कमी येतोय. त्यामुळे भाव वाढले आहेत,” असे एका घाऊक व्यापाऱ्याने सांगितले.

खरीप हंगाम जवळ आल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिके काढून त्या ठिकाणी मशागतीची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे नियमित भाजी मंडईत येणारा माल कमी झाला असल्याचे अंधारवाडी येथील भाजी विक्रेते बळीराम खुडे यांनी सांगितले. ते भाजी मंडईत आंबे विक्रीसाठी आले होते.

जिल्हाभरातून भाजीपाल्याची आवक घटल्याने परजिल्ह्यातून भाज्या आणाव्या लागत असून त्याचा थेट परिणाम बाजारभावावर होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

फळांचे दरही वाढले

बाजारात सफरचंद १८० ते २०० रुपये, पेरू ८० रुपये, मोसंबी ८० ते १२० रुपये, चिकू ६० ते ८० रुपये, द्राक्ष १०० ते ११० रुपये, डाळिंब १०० ते २५० रुपये, आवळा १२० ते १५० रुपये, अननस १०० ते १५० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. तर कलिंगड ६० ते १०० रुपये नगाप्रमाणे विक्री होत असल्याची माहिती विक्रेते शेख सत्तार यांनी दिली.

फुलांच्या दरातही तेजी

सध्या बाजारात विविध प्रकारची फुले विक्रीसाठी उपलब्ध असून निशिगंध २५० ते ३०० रुपये, गलांडा १५० ते २०० रुपये, शेवंती २०० ते ३०० रुपये तर गुलाब २५० ते ३५० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत असल्याचे फुलविक्रेते उमेश गुंजकर यांनी सांगितले.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026