वसमत तरुण खून प्रकरण

वसमत येथील तरुणाच्या खून प्रकरणाचा वसमत शहर पोलिसांनी लावला तपास

Vasmat youth murder case:  वसमत शहरातील  सुवर्णकार वसाहतीमध्ये राहणाऱ्या 33 वर्षीय तरुण अभिजीत शहाणे त्याच्या खून प्रकरणाचा शोध वसमत शहर पोलिसांनी लावण्यात यश मिळवले आहे

वसमत येथील तरुणाच्या खून प्रकरणाचा वसमत शहर पोलिसांनी लावला तपास

Vasmat Murder Case

 

तीन संशयित आरोपी जेरबंद; कारण अद्यापही गुलदस्त्यात

वसमत (Vasmat Murder Case) : वसमत शहरातील  सुवर्णकार वसाहतीमध्ये राहणाऱ्या 33 वर्षीय तरुण अभिजीत शहाणे त्याच्या खून प्रकरणाचा शोध वसमत शहर पोलिसांनी लावण्यात यश मिळवले आहे. या प्रकरणातील तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तिघांना न्यायालया समोर हजर करण्यात आले असून 26 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी पोलिसांनी मागितली आहे.

वसमत येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात शेजारी असलेल्या पाटबंधारे विभागाच्या जुनाट विश्रामगृहा जवळ 18 सप्टेंबर रोजी अभिजीत शहाणे या तरुणाचा मृतदेह आढळला होता.
डोक्यात दगडाने मारहाण करून त्यांची मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करत अज्ञात व्यक्तविरूद्ध वसमत शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

अज्ञात इसमा विरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याने वसमत शहर पोलिसांसमोर प्रकरणाचा तपास लावण्याचे आव्हान होते पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा यांनी वसमत येथे भेट देऊन पोलिसांना मार्गदर्शक सूचना देऊन त्वरित तपास लावण्याचे आदेश दिले होते. वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर डेडवाल यांनी तपासाचे सूत्र हलवली व तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. यातील एकाला तेलंगणा मधून ताब्यात घेण्यात आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये जय सुनिल थोरात राहणार वसमत,गुलफराज  पठाण रा, सेलू, हल्ली मुक्काम वसमत रामेश्वर  अड्सुळे  राहणार वसमत या तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आली आहे.

आरोपींना रविवारी न्यायालया समोर हजर करण्यात आले व पुढील तपासासाठी 26 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मागण्यात आली आहे खुनामागील नेमके कारण अद्याप स्षष्ट झालेले नाही. पोलीस कोठडी दरम्यान  नेमके कारण स्पष्ट होणार आहे. (Vasmat Murder Case) वसमत शहर पोलिसांनी अत्यंत जलद गतीने कोणाचा तपास करून आरोपींना ताब्यात घेतल्याने पोलिसांच्या कामगिरीचे स्वागत होत आहे. पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक  शंकर डेडवाल  व त्यांच्या पथकाने केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

संबंधित सामग्री

पोलिसांना टिप दिल्याच्या कारणातून वसमतमध्ये तरूणाचा खुन

पोलिसांना टिप दिल्याच्या कारणातून वसमतमध्ये तरूणाचा खुन

Vasmat Youth Murder: गँगवार पद्धतीने एका बावीस वर्षीय तरुणाचा भर रस्त्यावर दगड विटांनी हल्ला करून खून करून झाल्याची भयंकर घटना घडली आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर सोमवार पेठ भागात ही घटना

Sep 10, 2026