चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान सुपेकर यांची बिनविरोध निवड

बुलढाणा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील महत्त्वाच्या चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवड गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान सुपेकर यांची बिनविरोध निवड

Unopposed Election

उत्साहपूर्ण वातावरणात निवड प्रक्रिया पार; संचालक मंडळाची उपस्थिती, समर्थकांकडून जल्लोष

चिखली (Unopposed Election) : बुलढाणा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील महत्त्वाच्या चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवड गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या निवड प्रक्रियेत समाधान सुपेकर यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिदोरीगृहात झालेल्या निवड प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र घोंगे यांनी कामकाज पाहिले. यावेळी दोन संचालक वगळता सर्व संचालक उपस्थित होते. पक्षश्रेष्ठींकडून सभापतीपदासाठी समाधान सुपेकर यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यांच्या उमेदवारीचे तीन अर्ज दाखल करण्यात आले होते.

अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर कोणत्याही अन्य उमेदवाराचा अर्ज शिल्लक न राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र घोंगे यांनी समाधान सुपेकर यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.

घोषणा होताच बाजार समिती परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. समर्थक व कार्यकर्त्यांनी समाधान सुपेकर यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार केला तसेच फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान सुपेकर यांची निवड झाल्याने शेतकरी, व्यापारी तसेच बाजार समिती कार्यक्षेत्रातील घटकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सभापती निवडीवेळी धोंडगे श्रीकिसन तेजराव, थुट्टे गणेश पुंजाजी, पवार परमेश्वर सखाराम, मिसाळ श्रीकृष्ण सुभाष, भुतेकर पांडुरंग बाजीराव, वाकडे संतोष शिवाजी, समाधान गोविंदा सुपेकर, कमल विष्णु कुळसुंदर, मंदाबाई शेनफड भुतेकर, जाधव रामेश्वर श्रीपत, वानखेडे संतोष रमेश, खेडेकर रामेश्वर शिवशंकर, लाहुडकर मनोज सारंगधर, परिहार समाधान सुखदेव, गवई संजय सुखदेव व पवार राजेश गजानन उपस्थित होते.

संबंधित सामग्री

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज चिखली व धाड येथे महत्त्वपूर्ण बैठका

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज चिखली व धाड येथे महत्त्वपूर्ण बैठका

चिखली आणि धाड येथे आज दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठका होणार आहेत.

Nov 03, 2026
राज्यात 13,928 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 295 कुटुंबे अद्याप शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत!

राज्यात 13,928 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 295 कुटुंबे अद्याप शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत!

Maharashtra Farmer Suicides: महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे सत्र अद्याप थांबलेले नाही. वाढता उत्पादन खर्च, शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव, कर्जाचा वाढता बोजा आणि अनिश्चित नैसर्गिक परिस्थिती

Oct 28, 2026
खामगावजवळ काँग्रेस नेते कैलास फाटे यांच्या कारचा चक्काचूर; ट्रकच्या धडकेत थोडक्यात बचावले

खामगावजवळ काँग्रेस नेते कैलास फाटे यांच्या कारचा चक्काचूर; ट्रकच्या धडकेत थोडक्यात बचावले

कैलास फाटे यांच्या कारला खामगावजवळ ट्रकची जोरदार धडक. कारचा चक्काचूर, फाटे सुरक्षित; बुलढाणा काँग्रेसकडून घातपाताचा संशय.

Oct 21, 2026
उमाळी गावात रक्ताच्या नात्याला काळिमा! मुलाकडून वडिलांचा कोयत्याने वार करून खून; मलकापूर तालुक्यात खळबळ

उमाळी गावात रक्ताच्या नात्याला काळिमा! मुलाकडून वडिलांचा कोयत्याने वार करून खून; मलकापूर तालुक्यात खळबळ

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील उमाळी येथे १९ वर्षीय मुलाने ५० वर्षीय वडिलांवर कोयत्याने वार केल्याची प्राथमिक माहिती आहे.

Oct 16, 2026
एकनाथ खडसेंना बोदवड बाजार समितीत मोठा धक्का; भाजपचे जयपाल बोदडे सभापतीपदी बिनविरोध

एकनाथ खडसेंना बोदवड बाजार समितीत मोठा धक्का; भाजपचे जयपाल बोदडे सभापतीपदी बिनविरोध

बोदवड बाजार समितीत मोठे सत्तांतर! राष्ट्रवादीचे १७ संचालक असतानाही भाजपचे जयपाल बोदडे सभापतीपदी बिनविरोध; एकनाथ खडसेंना राजकीय धक्का.

Oct 15, 2026