११ वी ऑनलाईन

पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचे ११ वीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर!

Class 11 Admission: स्थानिक मा. सु. पा. महाविद्यालयात सन २०१९ व २०२० मध्ये इयत्ता ११ वीकरीता प्रवेश घेऊन पदवीचे शिक्षण घेत असताना अज्ञात आरोपीने जाणूनबुजून जाणीवपूर्वक चार महीला विद्यार्थिनीचे ११ वी

पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचे ११ वीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर!

Class 11 Admission


ठाणेदार याजकडे पालकांनी नोंदविली तक्रार! 
खोडसाळपणा करणाऱ्या अज्ञात आरोपी विरुद्ध कारवाई करण्याची मागणी!

मानोरा (Class 11 Admission) : स्थानिक मा. सु. पा. महाविद्यालयात सन २०१९ व २०२० मध्ये इयत्ता ११ वीकरीता प्रवेश घेऊन पदवीचे शिक्षण घेत असताना अज्ञात आरोपीने जाणूनबुजून जाणीवपूर्वक चार महीला विद्यार्थिनीचे ११ वीच्या प्रवेशासाठी मा. सु.पा. महाविद्यालयात पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज सादर केले आहे. अज्ञात आरोपीने केलेल्या  या कृत्यामुळे पाल्याला मानसिक त्रास सोसावा लागत असुन त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करावी व अज्ञात आरोपीचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी लेखी तक्रार दि. ८ जुलै रोजी ठाणेदार नैना पोहेकर यांना विद्यार्थिनींच्या पालकांनी केली आहे. 

पालकांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की, आमचे पाल्य कु. नेहा विनोद खुपसे, कु. अंजली विलास पुरी, कु.  विशाखा संतोष राठोड आणि कु. पायल राजू भोरकडे या विद्यार्थिनी सन २०१९ व २०२० मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन मा. सु . पा. महाविद्यालयात ११ वी करीता प्रवेश घेऊन पुढील शिक्षण घेत आहे. आजरोजी वरील विद्यार्थी हे पदवीचे शिक्षण घेत असताना चार विद्यार्थिनीच्या नावाचा ११ वी करीता ऑनलाईन अर्ज मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय मानोरा यांच्याकडे अज्ञात आरोपींनी पोर्टल द्वारे पाठविले आहे.

अज्ञात व्यक्तीकडून झालेल्या गैरवर्तनामुळे आमचे पाल्य विद्यार्थिनी यांना मानसिक त्रास होत असून त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी करून अज्ञात आरोपीचा शोध घेऊन  कारवाई करावी व न्याय द्यावा, अशी लेखी तक्रार पालकांनी ठाणेदार यांना दिली आहे. महिला विद्यार्थिनीना त्रास देण्याच्या उद्देशाने अज्ञात आरोपींनी केलेल्या कृत्याच्या चर्चेला उधाण आले असुन यावर पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरावरुन होत आहे.