रस्ता रोको आंदोलन

'कोई रस्ता दोचो काई आम्हारं नळगीर तांडेंन...रस्ता दो, रस्ता!’ घोषणांनी दणाणला परिसर

Rasta Roko Andolan: नळगीर तांड्यावर खाली पडलेल्या पक्क्या रस्त्याचे संकट गावाच्या सत्ताकर्ता नेतृत्वाखालील आंदोलने रोकण्यासाठी प्रशासकीय आश्वासन मागितल.

'कोई रस्ता दोचो काई आम्हारं नळगीर तांडेंन...रस्ता दो, रस्ता!’ घोषणांनी दणाणला परिसर

Rasta Roko Andolan


लेखी आश्वासनानंतरच मागे हटले ग्रामस्थ; प्रवीण (तेजस) पवार यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक रस्ता रोको आंदोलन

उदगीर (Rasta Roko Andolan) : तालुक्यातील नळगीर तांड्याच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पक्क्या रस्त्याच्या प्रश्नावर अखेर ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर उतरला. प्रवीण (तेजस) पवार यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी ग्रामस्थांनी उदगीर जळकोट राष्ट्रीय महामार्गावस तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडत प्रशासनाला धारेवर धरले. "कोई रस्ता दोचो काई आम्हारं नळगीर तांडेंन... रस्ता दो, रस्ता!" या घोषणांनी आंदोलनस्थळ दणाणून गेले आणि प्रशासनाला तातडीने घटनास्थळी धाव घ्यावी लागली. दीर्घकाळापासून रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच महावितरणचे कनिष्ठ अभियंता तातडीने आंदोलनस्थळी दाखल झाले.अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, "तोंडी आश्वासनांवर आता विश्वास नाही; लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही," अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली. अखेर प्रशासनाने रस्ता व इतर प्रलंबित विकासकामांबाबत निश्चित कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

या आंदोलनात मोठ्या संख्येने  तांडावाशीय ग्रामस्थ उपस्थित होते. नळगीर तांड्यातील रस्त्याच्या प्रश्नावर झालेले हे आंदोलन परिसरात चर्चेचा विषय ठरले असून, आता प्रशासन दिलेल्या लेखी आश्वासनाची कितपत पूर्तता करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

लेखी आश्वासनाची अमलबजावणी झाली नाही तर तीव्र आंदोलन करणार आंदोलनकर्ते तेजस पवार
प्रशासनाने ग्रामस्थांना जे लेखी आश्वासन दिले आहे त्या लेखी आश्वासनाची अमलबजावणी झाली नाही, तर यापेक्षाही तीव्र लोकआंदोलन उभारले जाईल. नळगीर तांड्यातील नागरिकांना त्यांचा हक्काचा पक्का रस्ता मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील.आसे आंदोलनाचे नेतृत्व करणारे प्रवीण (तेजस) पवार यांनी सांगीतले

तांडावाशीयाच्या पक्यारस्त्यासाठी प्रशासनस्तरावरुन प्रयत्न केले जात आसून लवकरच तांडावाशीयांना पक्का रस्ता मिळेल: तहसिलदार राम बोरगावकर
तांडावाशीयांनी पक्यारस्त्यासाठी  आंदोलन केले त्या आंदोलनातील मागण्याविषयी प्रशासन सकारात्मक आसून तांडावाशीयांच्या पक्यारस्त्यासाठी प्रशासन सकारात्मक आसून शासनस्तरावर त्या रस्त्याविषयी प्रयत्नशील आसून लवकरच ताडावाशीयांना पक्का रस्ता मिळेल.या रस्त्याच्या निधीसाठी शासनस्तरावरुन पाठपुरावा चालू आसून त्यामूळे लवकरच तांडावाशीयांना पक्का रस्ता मिळेल आसे तहसिलदार राम बोरगावकर यांनी सांगीतले.