संपत्ती वादातून रक्तरंजित हल्ला; आईसह दोन मुलांची निर्घृण हत्या

सोलापूर शहरालगतच्या बोरामणी परिसरात तिहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली असून मध्यरात्री आई आणि तिच्या दोन मुलांवर तलवारीने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

संपत्ती वादातून रक्तरंजित हल्ला; आईसह दोन मुलांची निर्घृण हत्या

Triple Murder Case

सोलापूर (Triple Murder Case) : सोलापूर शहरालगतच्या बोरामणी परिसरात तिहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली असून मध्यरात्री आई आणि तिच्या दोन मुलांवर तलवारीने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संपत्तीच्या वादातून महिलेच्या दिराने हे भयंकर कृत्य केल्याचे समोर आले आहे. मृतांमध्ये गायत्री सुधाकर मस्के, त्यांची मुलगी प्रिया मस्के आणि मुलगा शिवराज मस्के यांचा समावेश आहे.

गायत्री मस्के यांचे पती काही वर्षांपूर्वी निधन पावले होते. त्या आपल्या दोन मुलांसह बोरामणी परिसरात राहत होत्या. त्यांचा दिर पप्पू हा शेजारीच वास्तव्यास होता. मध्यरात्री तो तलवार घेऊन वहिनीच्या घरात घुसला. घर आणि गच्चीला एकच मार्ग असल्याने त्या ठिकाणी सर्वजण गच्चीवर झोपले होते.

याचवेळी आरोपीने अचानक हल्ला चढवला. सुरुवातीला त्याने गायत्री मस्के यांच्यावर तलवारीने वार केले. आईला वाचवण्यासाठी दोन्ही मुलांनी मध्ये पडण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने त्यांच्यावरही अमानुषपणे वार केले. या हल्ल्यात तिघेही जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्युमुखी पडले.

घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून संपूर्ण घर सील करण्यात आले आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे बोरामणी परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

संबंधित सामग्री

अक्कलकोटमध्ये जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळले; 13 विद्यार्थी आणि 2 शिक्षक जखमी

अक्कलकोटमध्ये जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळले; 13 विद्यार्थी आणि 2 शिक्षक जखमी

​​​​​​​सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बबलाद गावात जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली.

Aug 12, 2026
सोलापुरात भाजप आमदाराला गोळ्या घालण्याची चालकाला ऑफर? २ जणांविरोधात गुन्हा दाखल

सोलापुरात भाजप आमदाराला गोळ्या घालण्याची चालकाला ऑफर? २ जणांविरोधात गुन्हा दाखल

सोलापुरात भाजपच्या विद्यमान आमदाराला गोळ्या घालण्यासाठी त्यांच्याच वाहन चालकाला पैशाचे आमिष दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Aug 10, 2026
'सैराट' फेम अरबाज शेखच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे यांच्या FDA कडून नोबल हॉस्पिटलवर कारवाई

'सैराट' फेम अरबाज शेखच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे यांच्या FDA कडून नोबल हॉस्पिटलवर कारवाई

'सैराट' चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता अरबाज शेख याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या भावनिक व्हिडिओनंतर सोलापूरमधील नोबल हॉस्पिटल चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

Jul 09, 2026
'मुलांना झोपवते' म्हणत घराबाहेर पडली; आईने दोन निष्पाप मुलांसह केली आत्महत्या

'मुलांना झोपवते' म्हणत घराबाहेर पडली; आईने दोन निष्पाप मुलांसह केली आत्महत्या

सांगोला तालुक्यातील घेरडी येथे कौटुंबिक वादातून एका विवाहित महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना बुधवारी (१ जुलै) रात्री घडली.

Jul 03, 2026
रील स्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणाला नवे वळण; २५ दिवसांनी पती निलेश पाराध्येविरुद्ध गुन्हा दाखल

रील स्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणाला नवे वळण; २५ दिवसांनी पती निलेश पाराध्येविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील प्रसिद्ध रील स्टार रोहिणी पाराध्ये हिच्या आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे.

Jun 19, 2026