हरित हिंगोली’चा संकल्प

रोप लावले...आता जगविण्याची जबाबदारी; जायंट्स ग्रुप, नगर परिषद यांचा पुढाकार

Green Hingoli Abhiyan: शहराच्या वाढत्या सिमेंटच्या जंगलाला हिरवाईची किनार देत ‘हरित हिंगोली’चा संकल्प. जायंट्स ग्रुप हिंगोली, हिंगोली नगर परिषद आणि भारतीय विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने...

रोप लावले...आता जगविण्याची जबाबदारी; जायंट्स ग्रुप, नगर परिषद यांचा पुढाकार

Green Hingoli Abhiyan

हिंगोली (Green Hingoli Abhiyan) : शहराच्या वाढत्या सिमेंटच्या जंगलाला हिरवाईची किनार देत ‘हरित हिंगोली’चा संकल्प करण्यात आला. जायंट्स ग्रुप हिंगोली, हिंगोली नगर परिषद आणि भारतीय विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय विद्या मंदिर परिसर तसेच नगर परिषदेच्या मोकळ्या जागेत वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. नागरिक, विद्यार्थी, शिक्षक आणि पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

या वेळी वड, पिंपळ, कडुनिंब, आंबा, जांभूळ आदी देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे केवळ (Green Hingoli Abhiyan) रोपे लावण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता, ‘झाड लावा आणि झाड जगवा’ हा संदेश देण्यात आला. उपस्थित मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्वतः रोपे लावत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली.

वाढत्या शहरीकरणामुळे हिरवाईचे प्रमाण कमी होत असताना वृक्षांचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. झाडे केवळ सावली देत नाहीत, तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच हवेची गुणवत्ता सुधारण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे वृक्षारोपणाबरोबरच एक पेड मा के नाम, म्हणत रोपांचे नियमित संगोपन आणि संवर्धन करण्याची गरज मान्यवरांनी व्यक्त केली.

यावेळी भारतीय विद्या मंदिरचे मुख्याध्यापक प्रकाश अंभोरे, जायंट्स ग्रुप हिंगोलीचे अध्यक्ष डॉ. नामदेव कोरडे, विभागीय उपाध्यक्ष रत्नाकर महाजन, माजी अध्यक्ष किरणकुमार लाहोटी, उपाध्यक्ष निळकंठ गायकवाड, सचिव महेश शहाणे, संचालक सुदर्शन महाजन,  विठ्ठल सोळंके,  विलास जोशी तसेच नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक आकाश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

हिंगोलीला खऱ्या अर्थाने ‘ग्रीन सिटी’ बनवायचे असेल, तर प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते मोठे होईपर्यंत त्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले. या (Green Hingoli Abhiyan) उपक्रमातून वृक्षारोपणाचा केवळ कार्यक्रम न राहता पर्यावरण संवर्धनाची चळवळ उभी करण्याचा संदेश देण्यात आला.

संबंधित सामग्री

हिंगोलीत ‘हर घर एक पेड़ – एक संकल्प’ अभियानाचा शुभारंभ

हिंगोलीत ‘हर घर एक पेड़ – एक संकल्प’ अभियानाचा शुभारंभ

पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक घरापर्यंत हिरवाई पोहोचवण्याचा निर्धार मोहिमेतून करण्यात आला आहे.

Jun 15, 2026