अप्पर तहसील कार्यालय उपोषण

आखाडा बाळापूर अप्पर तहसील कार्यालयासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला मोठा प्रतिसाद 

Tehsildar office Hunger strike: आखाडा बाळापूर तालुका निर्मिती अप्पर तालुका घोषित करा या मागणीसाठी २ आक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आखाडा बाळापूर तालुका कृती समितीच्या वती

आखाडा बाळापूर अप्पर तहसील कार्यालयासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला मोठा प्रतिसाद 

Tehsildar office Hunger strike

 

तालुका कृती समितीच्या पुढाकाराने उपोषण 

आखाडा बाळापूर (Tehsildar office Hunger strike) : आखाडा बाळापूर तालुका निर्मिती अप्पर तालुका घोषित करा या मागणीसाठी २ आक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आखाडा बाळापूर तालुका कृती समितीच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते .सदरील उपोषण सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत आखाडा बाळापुर येथील ग्रामपंचायत समोर करण्यात आले या उपोषणामध्ये आखाडा बाळापूर तालुका निर्मितीचे स्वप्न पाहणारे अनेक सदस्य सहभागी झाले होते.

सन १९८१ पासुन आ. बाळापुर तालुका निर्मीतीची मागणी आहे. नांदेड हदगांव हिंगोली वसमत व पुसद हे तालुक्याचे ठिकाण आ.बाळापुर च्या पासुन ४० ते ६० कि.मी.च्या अंतरावर आहे. तेव्हा १५ ते २० कि.मी. त्रिजेचा व ५२ हजार हेक्टर क्षेत्र असलेल्या सर्व निकषानुसार या ठिकाण अप्पर तहसिल कार्यालय होऊ शकते.

२१ तलाठी सज्जे व ८५ गावे अशा प्रकारे आ. बाळापुर या ठिकाण अप्पर तहसिल कार्यालय बाबतीत मंजुरी देऊन या परिसरातील जनतेच्या सेवेचा विचार करावा आ. बाळापुर या अप्पर तहसिल कार्यालया अंतर्गत महसुल मंडळे या प्रमाणे १,आ. बाळापुर २,डोंगरकडा ३, वारंगा फाटा, ४ बोथी तर जुन्या कळमनुरी तालुक्यात १, कळमनुरी २,नांदापुर  वाकोडी ३, साळवा अश्या प्रकारे प्रत्येकी ४ महसुली मंडळे समाविष्ट होऊ शकतात तरी आ. बाळापुर या परिसरातील जनतेच्या मागणी नुसार या ठिकाणी अप्पर तहसिल कार्यालयाला मंजुरी द्यावी अशी विनंती शासनाकडे करण्यात आली आहे.

 या (Tehsildar office Hunger strike) उपोषणामध्ये शिवसेना नेते संजय पाटील बोंढारे, ,प्रा.ओम प्रकाश बोंढारे,देविकांतराव पतंगे, मधुकरराव चेटप,सय्यद असद कादरी , माजी उपसरपंच विजय पाटील बोंढारे, युवा सेना तालुका प्रमुख सचिन पेंढारकर,माजी जि.प.सदस्य भगवान खंदारे,डॉ. अरुण सुर्यवंशी , दैनिक देशोन्नती तालुका प्रतिनिधी शेख फारुख गिरगावकर, पत्रकार शफी डोंगरगावकर,प्रशांत सूर्यवंशी,संदीप नरवाडे, नंदकुमार बोंढारे,माधवराव सावंत, शंकर मुलगीर , प्रकाश जमदाडे, सय्यद अतिक, यशवंत खाडे ,राजेश नरवाडे, युवा नेतृत्व विठ्ठल पंडित,गजानन चव्हाण, तुषार सूर्यवंशी, देविदास बोंढारे ,दादाराव कदम,  संजय हापसे,नानाराव उपरे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते ठाकूरसिंग बावरी,शहर अध्यक्ष श्याम खाडे, युवक शहर अध्यक्ष शेख मोहम्मद,जयराम पंडित , शिवाजी वाघमारे, शेख अकबर,नाथा पंडीत, किशोरसिंह बयास, विलास सावंत ,संदीप मोरे,राजेश पाटेकर यांच्या सह मान्यवरांनी सहभाग नोंदविला अस मधुकरराव चेटप व शफी डोंगरगावकर यांनी सांगितले.