तळप ग्रामपंचायत विकास

तळप बु. येथील ग्रामपंचायत विकास कामात गैरव्यवहार!

Talap Gram Panchayat: मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या तळप बु येथील ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विकास कामात गैरव्यवहार झाला असून या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थानी

तळप बु. येथील ग्रामपंचायत विकास कामात गैरव्यवहार!

Talap Gram Panchayat

 

चौकशी करून कार्यवाहीसाठी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात 

मानोरा (Talap Gram Panchayat) : मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या तळप बु येथील ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विकास कामात गैरव्यवहार झाला असून या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थानी दि. २८ सप्टेंबर रोजी सोमवारपासून पंचायत समिती कार्यालयात अन्नत्याग आंदोलनाला प्रारंभ केला आहे.

गट विकास अधिकारी, तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, सन २०२१-२२ मध्ये १५ व्या वित्त आयोगातून २.९९ हजार रुपये आरओ प्लांट साठी मंजूर झाले. मात्र अद्याप आरओ प्लांट बसविण्यात आले नाही, परंतु हा निधी खर्च केला आहे.  तसेच क्रीडांगणासाठी आलेला निधी खर्च करून काम निकृष्ट करण्यात आले, दिव्यांगासाठी पाच टक्के निधी खर्च करण्यात आला नाही, दलीत वस्ती मधील रस्ता काम निकृष्ट करण्यात आले. यासह सर्व कामाची सखोल चौकशी करून न्याय द्यावा व भ्रष्ट्राचार करणाऱ्या  संबंधित शासनाची रक्कम वसूल करून कार्यवाही करण्यात यावी, या मागणीसाठी बंडू इंगोले, अनिल गायकवाड, सदानंद इंगोले, पवन वानखडे आदींनी सोमवारपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे.