Synthetic Milk

भूममध्ये कृत्रिम दूध रॅकेटचा संशय; व्हे पावडर साठा प्रकरणी गुन्हा दाखल, अनेक दूध संकलन केंद्रे तपासाच्या रडारवर

व्हे पावडर व व्हे परमीएट पावडरचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून, अनेक दूध संकलन केंद्रे, पुरवठादार आणि संबंधित व्यक्ती तपासाच्या रडारवर आल्या आहेत.

भूममध्ये कृत्रिम दूध रॅकेटचा संशय; व्हे पावडर साठा प्रकरणी गुन्हा दाखल, अनेक दूध संकलन केंद्रे तपासाच्या रडारवर

भूम : धाराशिव जिल्ह्यात कृत्रिम (सिंथेटिक) दूध निर्मिती व पुरवठ्याच्या संशयित साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली असून, भूम शहरातील एका ट्रेडिंग कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईनंतर या प्रकरणात भूम पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात व्हे पावडर व व्हे परमीएट पावडरचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून, अनेक दूध संकलन केंद्रे, पुरवठादार आणि संबंधित व्यक्ती तपासाच्या रडारवर आल्या आहेत.

फिर्यादी अन्न सुरक्षा अधिकारी रोहित दिनेश फंदी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 अंतर्गत कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा राज्यातील विविध भागांत पुरवठा होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झाली होती. त्यानुसार सहआयुक्त यांच्या आदेशानुसार ५ जुलै रोजी भूम येथील इंदिरानगरमधील मधुबन ट्रेडिंग कंपनी येथे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने पंचांसमक्ष तपासणी केली.

तपासणीदरम्यान गोदामात विविध सहा ब्रँडच्या एकूण ६१ गोण्या (प्रत्येकी २५ किलो) व्हे पावडर व व्हे परमीएट पावडरचा साठा आढळून आला. संबंधित मालक बाळासाहेब मधुकर घोडगे यांनी हा माल अकलूज येथील हेमंत कॉर्पोरेशनकडून खरेदी केल्याची बिले सादर केली. मात्र, हा साठा कोणाला विक्री करण्यात आला किंवा त्यासंदर्भातील विक्री बिले सादर करता आली नाहीत. वारंवार विचारणा करूनही समाधानकारक माहिती न दिल्याने अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी संपूर्ण साठा संशयाच्या आधारे अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत जप्त करून पुढील आदेशापर्यंत त्यांच्याच ताब्यात ठेवला.

कारवाईनंतर घोडगे यांनी १ डिसेंबर २०२५ ते ३१ मे २०२६ या कालावधीतील सेल रजिस्टर व ३० मार्च ते २९ मे २०२६ या कालावधीतील विक्री बिल बुक सादर केले. या नोंदींची तपासणी केली असता, व्हे पावडरचा पुरवठा विविध दूध विक्रेते, दूध संकलन केंद्रे व शीतकरण केंद्रांना करण्यात आल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला.

सेल रजिस्टरमधील नोंदींमध्ये धर्मराज शिंदे, हेमंत टेके, गजानन कांबळे, काकासाहेब डोम्बले, पल्लवी गजानन कांबळे, काशिनाथ अंबादास डोम्बले तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील इतर व्यक्तींची नावे आढळून आली. त्यांची FoSCOS प्रणालीवर पडताळणी केली असता संबंधित व्यक्तींच्या नावावर दूध संकलन केंद्रांचे अन्न परवाने असल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये तेम्बीआई दूध संघटन केंद्र, ईश्वरी दूध संकलन केंद्र आदी अनेक दूध संकलन केंद्रांचा समावेश असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, व्हे पावडर व व्हे परमीएट पावडरचा वापर दूधामध्ये भेसळ करण्यासाठी झाला असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या प्रकरणाची साखळी पद्धतीने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुरवठादार, साठा मालक, दूध संकलन केंद्रे, वाहतूक व्यवस्था तसेच शीतकरण केंद्रांपर्यंत संपूर्ण नेटवर्कची तपासणी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

फिर्यादीनुसार, आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 3(5), 61, 111, 274 व 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 मधील कलम 26, 27, 3(1)(zz)(iv) आणि शिक्षेसंबंधी कलम 59 अन्वये गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाला केवळ भेसळीचा नव्हे, तर सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर गुन्हा मानले असून, कृत्रिम दूध तयार करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या संपूर्ण साखळीचा पर्दाफाश करण्यासाठी सखोल तपास सुरू असल्याचे समजते. या तपासातून आणखी अनेक नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
चारधाम यात्रेने रचला नवा विक्रम; भाविकांची संख्या तब्बल 56.18 लाखांपार

चारधाम यात्रेने रचला नवा विक्रम; भाविकांची संख्या तब्बल 56.18 लाखांपार

Chardham Yatra Record: यंदा केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारही धामांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यातील धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटन

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026