माजी आमदार सुनील राणे

माजी आमदार सुनील राणे यांची जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

Former MLA Sunil Rane: नांदेडमध्ये भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रभारी सुनील राणे यांनी जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्याशी सदिच्छा भेट घेऊन युवा मोर्चाच्या कार्याचा आढावा

माजी आमदार सुनील राणे यांची जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

Former MLA Sunil Rane

युवा मोर्चाच्या कार्याचा घेतला आढावा

नांदेड (Former MLA Sunil Rane) : भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रभारी, प्रदेश महामंत्री तथा माजी आमदार सुनील राणे यांनी रविवारी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील क्षीरसागर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी जिल्ह्यातील युवकांच्या संघटनात्मक बांधणीवर भर देत विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

माजी. आ. सुनील राणे (Former MLA Sunil Rane) यांचे आगमन होताच जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील क्षीरसागर यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी भारतीय परंपरेनुसार शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन राणे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. ही भेट केवळ सदिच्छा भेट नसून आगामी काळात जिल्ह्यातील युवा शक्तीला दिशा देण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे. स्वागत सोहळ्यानंतर झालेल्या अनौपचारिक चर्चेत सुनील राणे यांनी नांदेड जिल्ह्यात युवा मोर्चाचे काम नेमके कशा पद्धतीने सुरू आहे, याचा आढावा घेतला. केंद्र आणि राज्य सरकारच्या जनहितकारी योजना तळागाळातील तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी युवा मोर्चाची भूमिका काय असावी, यावर त्यांनी भाष्य केले. तसेच, आगामी काळात संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि नवनवीन युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मोलाच्या सूचना दिल्या.

यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील क्षीरसागर,एकनाथ दादा पवार,बालाजी पाटील पुयड,करण चव्हाण, मुनवर शेख,शुभम खोडके यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे इतर अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील राणे यांच्या मार्गदर्शनामुळे जिल्ह्यातील युवा कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, आगामी काळात युवा मोर्चा अधिक आक्रमकपणे जनसेवेसाठी मैदानात उतरणार असल्याची प्रतिक्रिया भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील क्षीरसागर यांनी दिली आहे.

संबंधित सामग्री

उल्हास, वालधुनी प्रदूषणमुक्तीसाठी धडक मोहीम

उल्हास, वालधुनी प्रदूषणमुक्तीसाठी धडक मोहीम

Maharashtra Pollution Control Board: उल्हास आणि वालधुनी नद्यांमधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषणाचे स्रोत शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले.

Nov 18, 2026
शेकडो कार्यकर्त्यांसह बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश; धामणगावात नेमकं काय घडलं?

शेकडो कार्यकर्त्यांसह बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश; धामणगावात नेमकं काय घडलं?

अमरावतीत भाजपला मोठा धक्का! प्रताप अडसड यांच्या मतदारसंघातील रामदास निस्ताने यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश.

Nov 18, 2026
उल्हास, वालधुनी प्रदूषणमुक्तीसाठी धडक मोहीम

उल्हास, वालधुनी प्रदूषणमुक्तीसाठी धडक मोहीम

Maharashtra Pollution Control Board: उल्हास आणि वालधुनी नद्यांमधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषणाचे स्रोत शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले.

Nov 18, 2026
बाळासाहेबांचा फोटो फाडल्यावर संजय राऊत संतापले; शिंदे गटाला दोन शब्दांत सुनावलं 'बकवास लेकाचे'

बाळासाहेबांचा फोटो फाडल्यावर संजय राऊत संतापले; शिंदे गटाला दोन शब्दांत सुनावलं 'बकवास लेकाचे'

शायना एनसी यांच्या कृतीवरून राजकीय वाद; संजय राऊतांचं दोन शब्दांत टीकास्त्र, तर मुंबई महापालिकेत ठाकरे गटाची घोषणाबाजी.

Nov 18, 2026
सांगली जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय सत्तेची मोहर! महेंद्र लाड अध्यक्ष, तानाजी पाटील उपाध्यक्षपदी बिनविरोध

सांगली जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय सत्तेची मोहर! महेंद्र लाड अध्यक्ष, तानाजी पाटील उपाध्यक्षपदी बिनविरोध

सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी महेंद्र लाड, तर उपाध्यक्षपदी तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड. गोपीचंद पडळकर यांच्या अनुपस्थितीची चर्चा.

Nov 18, 2026