जिल्हाधिकारी यांचे नागरिकांना आवाहन
नागपूर (SIR Process) : SIR च्या फेज-१ मध्ये Unmapped Electors तसेच Logical Discrepancies असलेल्या मतदारांच्या नोंदींची पडताळणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. संबंधित नागरिकांच्या घरी BLO/AERO पथकांकडून संपर्क साधला जाईल. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर नोंदीचे मॅपिंग अथवा विसंगतीचे निराकरण झाल्यास स्वतंत्र सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची आवश्यकता राहणार नाही.
तसेच, प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव नसल्यास नमुना ६ (Form-6) भरून मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येईल. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी प्रशासन आवश्यक ती कार्यवाही करीत आहे. नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.