कढई प्रसाद, आरती व भजनाने भक्तिमय वातावरण
नागपूर (Shri Gajanan Maharaj) : श्री गजानन महाराज सेवा समिती, तारोडी खुर्द यांच्या वतीने ऋषी पंचमीचे औचित्य साधून संत शिरोमणी श्री गजानन महाराज यांचा 116 वा पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आला. यासोबतच नागद्वार सेवा मंडळ, प्रधानमंत्री आवास योजना यांच्या वतीने कढई प्रसाद, आरती व भजनाचा कार्यक्रमही घेण्यात आला. झेंडा चौक गणेशोत्सव मंडळ, प्रधानमंत्री आवास योजना, खासरा क्र. 63, तारोडी खुर्द येथे हा धार्मिक कार्यक्रम पार पडला. सकाळपासूनच परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री गजानन महाराजांचे (Shri Gajanan Maharaj) दर्शन घेतले तसेच आरती व भजनात सहभाग घेतला.
या (Shri Gajanan Maharaj) शुभ मंगल प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून नगरपंचायत बिडगाव-पांढुर्णा-तरोडी खुर्दचे नगराध्यक्ष वीरू जमगडे, शिक्षण समितीचे सभापती व वॉर्ड क्र. 14 चे नगरसेवक प्रीतम बोकडे, भाजपा बिडगाव अध्यक्ष पुंडलिकजी कुर्वेकर, वाठोडा पोलीस स्टेशनच्या PSI कांबळे मॅडम, वाठोडा पोलीस स्टेशनच्या नूतन पराते, श्री गजानन महाराज सेवा समितीचे अध्यक्ष जगदीशजी दमानी, झेंडा चौक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नारायणजी डहरवाल, सचिव अक्षय इंगळे, श्री संत गजानन महाराज आवास योजनेचे संयोजक संदीपजी पट्टेवार, सुषमाताई बोकडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
यावेळी झेंडा चौक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, श्री गजानन महाराज (Shri Gajanan Maharaj) सेवा समितीचे सदस्य, महिला मंडळ तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी झेंडा चौक गणेशोत्सव मंडळाचे विशेष सहकार्य लाभले. धार्मिक विधी, आरती, भजन आणि कढई प्रसादाच्या माध्यमातून भाविकांनी श्री गजानन महाराजांच्या चरणी श्रद्धा अर्पण केली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.