शोभा काला नेत्रदान

शोभा काला यांचे मरणोत्तर नेत्रदान; दोन अंधांना दृष्टी प्रदान

Shobha Kala Eye Donation: शोभा सुरेशकुमार काला यांचे जवळा बाजार येथे निधन. या दुःखाच्या घडीत सुद्धा त्यांच्या कुटुंबियांनी नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला.

शोभा काला यांचे मरणोत्तर नेत्रदान; दोन अंधांना दृष्टी प्रदान

Shobha Kala Eye Donation

जवळा बाजार (Shobha Kala Eye Donation ) : तामसा ता. हदगाव येथील शोभा सुरेशकुमार काला (वय ६३) यांचे २४ जुन रोजी सकाळी ०६.३० वाजता जवळा बाजार येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर सायंकाळी सहा ०५.३० वाजता जवळा बाजार येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

दरम्यान अखिल भारतीय मारवाडी महिला सम्मेलन राष्ट्रीय जनसंपर्क समितीच्या प्रमुख अर्चना सोनी तसेच नंदू बाहेंती, डॉ. राजकुमार भारूका यांनी कुटुंबियांना संपर्क साधून नेत्रदान करण्याची विनंती केली. या दुःखाच्या घडीत सुद्धा त्यांच्या कुटुंबियांनी नेत्रदान (Shobha Kala Eye Donation) करण्याचा निर्णय घेतला. यांची माहिती हिंगोली येथील गॅलक्सी सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत पुढील प्रक्रिया पूर्ण केली. दुपारी २.१५ वाजता ऑपरेशन डॉ. सादिक बेनिवाले यांनी केले. पुढे यांचे नेत्र जालना येथील गणपती नेत्रालयात नेण्यात आले आहेत. यातून दोन अंधांना दृष्टी प्रदान होईल. गॅलक्सी सेवाभावी संस्थेचे हे ११० नेत्रदान आहे.