कन्हान (Shiva Rajyabhishek ceremony) : महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवा जी महाराजांचा " शिवराज्यभिषेक सोहळा " टेकाडी गाव येथे शिव छत्रपती प्रतिष्ठान व शिवप्रेमी व्दारे भगवे झेंडे लावुन महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार, पुष्प अर्पण व दिपप्रज्वलित करून मानवंदना देऊन शिव राज्यभिषेक सोहळा थाटात साजरा करण्यात आला.
टेकाडी येथे राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान " च्या वतीने शिवराय मनामना त, शिवराय घराघरात " या उपक्रमांतर्गत गावात दर वर्षी प्रमाणे हनुमान मंदीर चौक टेकाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस सुरेश मोहाडे, रविंद्र गणोरकर, हरिश्चंद्र ठाकरे, गोविंद शेंदरे, शिवनारायण आकोटकर, शिवशंकर आकोटकर यांच्या हस्ते पुष्प हार व पुष्प अर्पण आणि दिपप्रज्वलित करून " शिवाजी महाराजांचा जयघोष व जय,जयकार करून (Shiva Rajyabhishek ceremony) शिवराज्यभिषेक सोहळा थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी गणेश मस्के, सुधाकर राऊळकर, राजेश मोरे, नत्थुजी कांबळे, प्रमोद मोरे, उमेश मोरे, अंकित लक्षणे, सचिन वाघमारे, सचिन भोयर, रामकृ ष्ण पावडे, संजय वासाडे सह मान्यवर मंडळी आणि शिवप्रेमी नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
टेकाडी येथे 'शिवराज्यभिषेक सोहळा' थाटात साजरा
Shiva Rajyabhishek ceremony: टेकाडी येथे शिवराज्यभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला. शिव छत्रपती प्रतिष्ठान व शिवप्रेम्यांनी शिवराज्यभिषेक थाटात साजरा केला, पुष्पहार, दिपप्रज्वलित आणि जयघोष
Shiva Rajyabhishek ceremony
संबंधित सामग्री
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत
जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय
अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?
राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव
तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल
पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.