पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याचा आरोप; ६ ऑगस्ट रोजी कारवाईचे आदेश
चिखली (Shiv Sena's Rahul Varvande) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन करून पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत राहुल रामदास वरवंडे यांची शिवसेना उपशहर प्रमुख पदावरून तात्काळ प्रभावाने हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबतचा अधिकृत आदेश पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून ६ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आला. शिवसेनेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आदेशात नमूद केल्यानुसार, राहुल रामदास वरवंडे यांनी पक्षाच्या धोरणांविरुद्ध तसेच पक्षशिस्तीच्या विरोधात वर्तन केल्याचा आरोप आहे. त्यांच्या या कथित पक्षविरोधी भूमिकेमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली असून संघटनात्मक शिस्तीलाही बाधा पोहोचल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या (Shiv Sena's Rahul Varvande) पार्श्वभूमीवर पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्याच्या कारणावरून वरवंडे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आदेशानुसार त्यांना शिवसेना उपशहर प्रमुख या पदावरून तात्काळ प्रभावाने पदमुक्त करण्यात आले असून, या पदाशी संबंधित त्यांचे सर्व अधिकारही रद्द करण्यात आले आहेत. सदर कारवाईचा आदेश शिवसेना शहर प्रमुख श्रीराम सखाराम झोरे तसेच शिवसेना तालुका प्रमुख श्रीकिशन तेजराव धोंडगे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईमुळे चिखली शहरातील शिवसेनेच्या स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.