अमरावती (Scholarship Examination) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वतीने 26 एप्रिलची शिष्यवृत्ती परीक्षा सकाळच्या सत्रात घेण्यात यावी याबाबतचे निवेदन व्हाट्सअप द्वारे व ईमेल द्वारे डॉक्टर नंदकुमार बेडसे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद व आयुक्त महेश चौथे आयुक्त परीक्षा परिषद यांना पाठविले होते मात्र शिक्षण परिषदेने ही मागणी नाकारली असुन रविवारला तापत्या उन्हात चिमुकले विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्ष देणार आहे.शिक्षण विभागाच्या अश्या हेकाखोरीचा शिक्षक संघटना यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.
परीक्षा परीषद पुणे व्दारा ४थी व ७वीची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या रविवार २६एप्रिलला भर उन्हात पहीला पेपर ११ते१२.३० व दुसरा पेपर दुपारी २ते ३.३०या वेळे घेण्याचे नियोजीत आहे.संद्धा संपूर्ण महाराष्ट्रात उष्ण उन्हाची लाट आहे. (Scholarship Examination) जिल्हा परिषद शाळेची परिस्थिती पाहली तर कीत्येक वर्ग खोल्या टिनाच्या पञ्याच्या आहे,वर्गात फाॅन नाही,असले तर लाईन नाही.ग्रामिण भागात तिव्र पाणी टंचाई आहे.विद्यार्थांच्या आरोग्याचा विचार करता ही परीक्षा सकाळ पाळीत घेण्याची मागणी पालक,शिक्षक,शिक्षक संघटना यांनी केली होती. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये इयत्ता चौथी व इयत्ता सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक 26 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.
सध्या राज्यामध्ये उन्हाचा प्रखर तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अनेक शाळांमध्ये पुरेशी पंख्यांची तसेच थंड पाण्याची सुविधा उपलब्ध नाही.अशा परिस्थितीत दुपारच्या वेळेत परीक्षा देताना विद्यार्थ्यांवर उष्णतेचा / उष्माघाताचा विपरीत परिणाम होऊन त्यांची एकाग्रता व मानसिक स्थिती ढासळण्याची शक्यता आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. म्हणून सदर परीक्षा त्याच दिवशी घेण्यात यावी, मात्र तिचे वेळापत्रक सकाळच्या वेळेत ठेवण्यात यावे, (Scholarship Examination) परीक्षेची वेळपहिला पेपर : सकाळी 8.30 ते 10.00,दुसरा पेपर : सकाळी 10.30 ते 12.00 विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद आयुक्त पुणे यांच्या कडे केली होती.पण शिक्षण परीक्षा संचालनालय यांनी मागणी मान्य केली नाही.
अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली
Scholarship Examination: महाराष्ट्रातील शिक्षक संघटनांनी शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक सकाळच्या सत्रात ठेवण्याची मागणी केली होती, मात्र शिक्षण परिषदेने ती नाकारली
Scholarship Examination
संबंधित सामग्री
पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी
MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण
Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!
Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा
मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत
फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.