Sea Drowning

गणपतीपुळेत मोठी दुर्घटना; छत्रपती संभाजीनगरातील पाच पर्यटक समुद्रात बेपत्ता

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथे शनिवारी (२० जून) सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत छत्रपती संभाजीनगर येथील पाच तरुण समुद्रात बेपत्ता झाले आहेत.

गणपतीपुळेत मोठी दुर्घटना; छत्रपती संभाजीनगरातील पाच पर्यटक समुद्रात बेपत्ता

Sea Drowning

पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने प्रवाहात वाहून गेले; प्रशासन, पोलीस व मच्छीमारांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम

रत्नागिरी (Sea Drowning) : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथे शनिवारी (२० जून) सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत छत्रपती संभाजीनगर येथील पाच तरुण समुद्रात बेपत्ता झाले आहेत. समुद्रातील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने हे पाचही जण पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून १९ जणांचा एक गट पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आला होता. सुटीचा आनंद घेण्यासाठी सर्वजण समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. यावेळी काही जण समुद्रात पोहण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाच तरुण समुद्राच्या प्रवाहात वाहून गेले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस, जीवरक्षक आणि स्थानिक मच्छीमार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी बोटींच्या मदतीने युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, समुद्रातील वेगवान प्रवाह आणि उंच लाटांमुळे बचावकार्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याची माहिती मिळाली आहे.

बेपत्ता पर्यटकांची नावे

  • आदित्य राऊत
  • यश कांबळे
  • अनिकेत हिवराळे
  • प्रेम आदमाने
  • आनंद नरवडे

या पाचही तरुणांचा शोध सुरू असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पर्यटकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

मराठवाडा पदवीधर मतदार यादीत ‘उद्धव मस्के’ऐवजी उद्धव ठाकरे यांचे नाव आल्याचा दावा. दिलीप घुगे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली.

Oct 05, 2026
निदा खानच्या अडचणी वाढल्या; ८ महिन्यांच्या गर्भवती असताना पतीकडून घटस्फोटासाठी अर्ज, १६ ऑक्टोबरला न्यायालयात हजेरी

निदा खानच्या अडचणी वाढल्या; ८ महिन्यांच्या गर्भवती असताना पतीकडून घटस्फोटासाठी अर्ज, १६ ऑक्टोबरला न्यायालयात हजेरी

नाशिक धर्मांतर प्रकरणातील निदा खानसमोर वैवाहिक संकट. आठ महिन्यांची गर्भवती असताना पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून १६ ऑक्टोबरला कोर्टात हजेरी आहे.

Oct 04, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026